शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:21 IST

Manisha Kayande on Eknath Shinde: शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला.

काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागची दोन कारणे सांगितले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजनेमुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले, असे त्या म्हणाल्या.

एका कार्यक्रमात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही मुख्यमंत्र्यांची चर्चा होते, तेव्हा फक्त एकनाथ शिंदे यांचाच चेहरा समोर येतो. एकनाथ शिंदे हे आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी शिवसैनिकांसाठी मुख्यमंत्रीच आहेत आणि कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही."

पुढे बोलताना मनीषा कायंदे यांनी महायुती सत्तेत येण्यामागचे दोन कारण सांगितले आहेत. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना यांनी महायुतीच्या विजयाच्या मोलाची भूमिका बजावली, असे मत त्यांनी व्यक्त केले. "एकनाथ शिंदे केवळ भाषणच देत नाही तर चांगली कामगिरीही करतात. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत", असे त्या म्हणाल्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या २३० जागांमध्ये भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागांवर विजय मिळवण्यात यश आले. तर काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण