शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे प्रकल्प तातडीने करा

By admin | Updated: November 8, 2014 03:51 IST

मुंबईतील वाहतुकीच्या जटील समस्येवर उपाय असलेले सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजनबद्ध रीतीने कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत व नागरिकांना दिलासा

मुंबई : मुंबईतील वाहतुकीच्या जटील समस्येवर उपाय असलेले सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजनबद्ध रीतीने कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील प्रलंबित पायाभूत प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, सिडकोचे संजय भाटिया, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा आदी बैठकीला उपस्थित होते.एमएमआरडीएमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो लाइन २ व मेट्रोलाइन ३ या प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या वेळी एमएमआरडीएचे मदान यांनी शिवडी ते चिर्ले हा ट्रान्सहार्बर लिंक उपयुक्त ठरेल, असे सांगितले. चारकोप-वांद्रे-नामखुर्द हा इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प आता चारकोपच्या पुढे दहिसरपर्यंत विस्तारित केल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पाचा जवळपास १६ लाख प्रवाशांना फायदा होणार आहे, तर मेट्रो ३ हा कुलाबा ते वांद्रे असा पूर्णत: भुयारी मार्ग असेल. ३२.५ कि.मी. लांबीच्या प्रकल्पात २७ स्टेशन्स असतील. नरिमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी तसेच विमानतळ या ठिकाणीही या प्रकल्पाची स्टेशने असून वाहतूक खोळंबा टाळण्यास त्याची मदत होईल, असे स्पष्ट केले.एमएसआरडीसीतर्फे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्प फेरी व्हार्फ (भाऊचा धक्का) ते नेरळ व मांडवा याबरोबरच पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी जलवाहतूक प्रकल्पाचेही सादरीकरण करण्यात आले. जलवाहतुकीचा प्रकल्प ५६८ कोटींचा आहे. सिडकोचे संजय भाटिया यांनी नवी मुंबईतील विमानतळ प्रकल्पासाठी ७५ टक्के जमीन संपादित झाली असून, उर्वरित जमिनीसाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)