शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती'; शिवसेना प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 2:14 PM

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

मुंबई: राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती आहे. त्यामुळे त्या कॅनव्हासमध्ये शिवसेना रंग भरेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये कृषी, शिक्षण क्षेत्रात केलेलं काम अतिशय उल्लेखनीय असून प्रत्येक आमदारानं ते पाहायला हवं, असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा का, यावर उद्धव ठाकरे भाष्य करतील, असंदेखील ते पुढे म्हणाले. नाशिकमधले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज राष्ट्रवादीला रामराम हाती शिवबंधन बांधलं. यावेळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. निकालानंतर आम्हाला तीन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढेल, असं राऊत म्हणाले. शिवसेनेसमोर आणखी कोणते पर्याय आहेत, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना 'आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमच्यासमोरचे पर्याय लवकरच समजतील,' असं सूचक विधान त्यांनी केलं.नवनिर्वाचित आमदारांनी बारामतीला भेट देऊन पवारांनी केलेलं काम पाहावं, असं राऊत यांनी म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. बारामतीत पवारांनी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. ते नव्या आमदारांना पाहायला हवं, असं राऊत म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे लवकरच बोलतील, असं शिवसेना खासदारांनी म्हटलं. राज्याचा राजकीय कॅनव्हासमध्ये शिवसेना रंग भरेल. तो ब्रश उद्धव यांच्या हाती आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीBJPभाजपा