शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 6:12 AM

प्रचारसभांचा धडाका, सभांच्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांसह देशातील ९४ मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभेच्या ११ मतदारसंघांत रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 

राज्यातील निवडणुकीच्या  प्रचाराच्या निमित्ताने महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन तिसरा टप्पा गाजवला. 

प्रचारसभांचा धडाका, सभांच्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. 

रोहित पवार यांचे डोळे पाणावलेबारामती : सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत आमदार रोहित पवार भावुक झाले व त्यांचे डोळे पाणावले. जेव्हा पक्ष फुटला त्यावेळी नवीन पिढी जबाबदारी घेईपर्यंत माझे डोळे मिटणार नाहीत, हे साहेबांचे शब्द होते, हे सांगताना रोहित गहिवरले.

अन् अजित पवारांनी केली नक्कल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांची रडतानाची मिमिक्री केली. ते म्हणाले, आमच्या पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो.

कोणत्या राज्यांत किती जागांवर मतदान? आसाम (४), बिहार (५), छत्तीसगड (७), गोवा (२), गुजरात (२६), कर्नाटक (१४), मध्य प्रदेश (८), महाराष्ट्र (११), उत्तर प्रदेश (१०),  पश्चिम बंगाल (४), दादरा-नगर हवेली / दीव-दमण (२) आणि जम्मू-काश्मीर (१) मध्ये मतदान आहे.

रायगडमध्ये महायुती-मविआत थेट लढतरायगड लोकसभा मतदारसंघात गेले दीड महिने सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली  आहे. ७ मे रोजी मतदान होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४