शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 6:38 AM

महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचारसभा रविवारी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई/अलिबाग : ठाण्याला स्वतःची मालकी समजणाऱ्यांची मस्ती उतरवायला आलो आहे आणि ती उतरविणारच, असा निर्धार उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐरोली येथील सभेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचारसभा रविवारी झाली. यावेळी तमाम शिवसैनिक हे माझे निवडणूक रोखे असून, यंदा हे सगळे वटविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ४०० पार सभा घेतल्या तरी ते जिंकू शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. देशाची सीमा असुरक्षित असून, जवानांवर सतत हल्ले होत आहेत. तुमच्या नादानपणामुळे त्यांचे जीव जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभर आपण सभा घेत असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही गर्दी भाजपच्या पराभवाचा जल्लोष करण्यासाठी जमत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवर खंत व्यक्त करत मोदी परत सत्तेत आल्यावर पाकिस्तानमध्ये जल्लोष होईल, असा त्याचा अर्थ घ्यायचा का, असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाला मोदींनी घरची धुणीभांडी करायला ठेवल्याने अशा आयुक्तांना आपण धोंड्या नाव ठेवल्याची टीका त्यांनी केली.

‘भाजपच्या चक्रीवादळाला रायगडकर रोखतील’ रायगड वासीयांमध्ये चक्रीवादळे परतावून लावण्याची ताकद आहे. आताही ते भाजपरूपी चक्रीवादळाचा मुकाबला यशस्वीपणे करतील, असा आपल्याला ठाम विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. इंडिया आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबाग येथे जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. शिवसेना-भाजपसोबत असताना मोदींना राज्यात सभा घेण्याची वेळ आली नव्हती. मात्र, आता गल्लोगल्ली सभा घ्यावी लागत असल्याचे सांगत देशाला डाग लावणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेraigad-pcरायगड