Join us  

विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची पहिली बॅच काल अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 3:42 PM

Open in App

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाची पहिली बॅच काल अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली. या बॅचमध्ये विराट कोहली व हार्दिक पांड्या हे न दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये RCB व MI यांचे आव्हान संपले असूनही ही दोघं संघासोबत का नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रमुख सामन्यापूर्वी भारताला १ जूनला बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळायचा आहे आणि त्या सामन्याला विराट मुकण्याची शक्यता आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एलिमिनेटरमधून बाहेर पडला, तरीही विराट टीम इंडियाच्या पहिल्या बॅचसोबत अमेरिकेला रवाना झाला नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार, विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे विश्रांतीसाठी वेळ मागितला आहे. RCB च्या पराभवानंतर विराट खचला आहे. त्यामुळेच तो कदाचित बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोहलीने BCCI ला आपण काही दिवसांनी टीम इंडियाला जॉईन होईल आणि त्यामुळेच त्याने त्याची व्हिसा अपॉईंटमेटही उशीरा ठेवली आहे. ३० मे रोजी तो अमेरिकेसाठी रवान होण्याचा अंदाज आहे. 

 "कोहलीने आम्हाला आधीच कळवले होते की तो संघात उशिरा सामील होणार आहे आणि म्हणूनच BCCIने त्याची व्हिसाची  अपॉईंटमेंट नंतरच्या तारखेसाठी ठेवली आहे. तो ३० मे रोजी पहाटे न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे, ” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. 

 भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024विराट कोहलीबीसीसीआयरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर