शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
4
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
5
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
6
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
7
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
9
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
10
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
11
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
12
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
13
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
14
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
15
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
16
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
17
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
18
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 3:55 PM

“आजकाल नरेंद्र मोदींच्या मुलाखती सुरू आहेत. ते चार चमचे बसवतात अन् प्रश्न विचारतात..."

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोरही वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी हिमाचल प्रदेशातील नाहान येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक पत्रकारांनी पंतप्रधान मोदींना कठोर प्रश्न विचारले नसल्याचा आरोप केला आणि त्यांना पुन्हा एकदा 'चमचा' म्हटले. याआधीही दिल्लीतील एका जाहीर सभेत राहुल यांनी अनेक पत्रकारांना चमचा म्हटले होते.

यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवरुन त्यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “आजकाल नरेंद्र मोदींच्या मुलाखती सुरू आहेत, ते चार चमचे बसवतात अन् ते प्रश्न विचारतात की, मोदीजी, तुम्ही आंबे कसे खाता? सोलून खाता की चोखून खाता?” मग मोदीजी उत्तर देतात की, मला माहित नाही, सर्व काही आपोआप घडते, देव मला मार्गदर्शन करतो. मी भारतातील एकमेव व्यक्ती आहे, ज्याचा देवाशी थेट संपर्क आहे. यावर चमचे म्हणतात व्वा, व्वा मोदीजी, काय मस्त बोललात. तुम्ही मीडियामध्ये शेतकऱ्यांबद्दल कधीच ऐकले नसेल, पण अंबानींचे लग्न नक्कीच पाहिले असेल. नरेंद्र मोदींनी देशात 22 अब्जाधीश निर्माण केले, आम्ही देशात करोडो करोडपती निर्माण करणार आहोत," असं राहुल म्हणाले.

काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी लढा दिला 

“ज्या व्यक्तीचा देवाशी थेट संबंध आहे, त्याला संविधानाची काय गरज? ते थेट देवाशी बोलतात. मला तर थोडी भीती वाटते आहे. मला त्याला विचारायचे आहे की, मोदी जी, तुम्हाला जी काही भावना येते, ती सकाळी, संध्याकाळी की 24 तास असते?" असा टोलाही राहुल यांनी मोदींना लगावला. ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि जनतेच्या सोबतीने देशाला संविधान दिले. आपण खोलवर पाहिले तर संविधानाचे विचार हजारो वर्षे जुने आहेत. मात्र भाजपचे लोक या संविधानावर हल्ला करत आहेत. ते संविधान बदलणार असल्याचे उघडपणे सांगतात."

प्रियांका गांधी काय म्हणाल्या?यावेळी प्रियंका गांधी यांनीदेखील सरकारवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, "भारतात शेतकऱ्यांचा आदर करण्याची परंपरा आहे. पण मोदी सरकारने 'किसान सन्मान'ला केवळ आश्वासने दिली. हे सरकार ना शेतकऱ्यांचा आदर करते, ना त्यांच्या फायद्याचे बोलते. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, शेतीशी संबंधित गोष्टींवर जीएसटी लावण्यात आला. मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे आणले तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकरी दिल्लीबाहेर बसून राहिले, 700 हून अधिक शेतकरी शहीद झाले, पण ते झुकले नाही. शेतकऱ्यांना दहशतवादी आणि देशद्रोही म्हटले, पण नरेंद्र मोदींनी त्यांचे एकदाही ऐकले नाही. यूपीमध्ये निवडणुका होणार असताना हे कायदे मागे घेण्यात आले."

प्रियंका गांधींचे सरकारला प्रश्न..."मोदी सरकार शेतकऱ्यांचा आदर करत नाही. नरेंद्र मोदींनी जनतेचाही अनादर केला. निवडणुकीच्या व्यासपीठावरुन ते सार्वजनिक प्रश्नांवर बोलत नाहीत. आज देशात फक्त काँग्रेस पक्षच जनतेबद्दल बोलत आहे. लोकांचा आवाज ऐकण्यासाठी राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते महाराष्ट्रात चालत गेले. सरकार जनतेसाठी चालवले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. नरेंद्र मोदी मोठ्या व्यासपीठावर म्हणतात - देश प्रगती करत आहे, अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. असे असेल तर..  करोडो तरुण बेरोजगार का? देशात 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी का? महागाई इतकी का वाढत आहे? येथे पोलाद उत्पादन का ठप्प झाले?" असे सवाल प्रियंका गांधींनी सरकारला विचारले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी