Join us  

हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 2:12 PM

Hardik Pandya-Natasa Divorce : घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच हार्दिकच्या पत्नीला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच हे सेलिब्रिटी कपल चर्चेत आलं आहे. भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही म्हटलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच हार्दिकच्या पत्नीला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. 

हार्दिकबरोबरची संसाराची घडी विस्कटली असताना नताशा एका मिस्ट्री मॅनबरोबर दिसली. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन नताशाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत नताशाबरोबर एक तरूणही दिसत आहे. हा मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. या व्हिडिओमुळे पुन्हा हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

नताशासोबतचा मिस्ट्री मॅन कोण? 

नताशाबरोबर व्हिडिओत दिसणारा हा मिस्ट्री मॅन दुसरा तिसरा कोणी नसून फिटनेस ट्रेनर एलेक्झांडर एलिक आहे. तो बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा मित्र आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना तो फिटनेसचं ट्रेनिंगही देतो. एलेक्झांडर आणि नताशाही चांगले मित्र आहेत. पण, हा व्हिडिओवर मात्र नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. "मला हार्दिक आवडत नाही पण मला त्याच्याबाबत वाईट वाटतंय", "हार्दिकबद्दल वाईट वाटतंय" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

हार्दिक आणि नताशाने २०२०मध्ये गुपचूप लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काहीच महिन्यात हार्दिक आणि नताशाला अगस्त्य हा मुलगा झाला. त्यानंतर पुन्हा गेल्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्ये त्यांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. हार्दिक-नताशाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या हे नाव काढून टाकल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या. त्यात हार्दिकने नताशाच्या वाढदिवशी पोस्ट केली नसल्याने या चर्चांना उधाण आलं. तसंच त्यांनी सोशल मीडियावर फोटो डिलीट केल्याचंही म्हटलं जात आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचसेलिब्रिटीघटस्फोट