Join us  

नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 5:55 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात देशात स्टार्टअप कंपन्यांची जोरदार क्रेझ आहे. नोकरीच्या शोधात धावणारे होतकरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात देशात स्टार्टअप कंपन्यांची जोरदार क्रेझ आहे. नोकरीच्या शोधात धावणारे होतकरू तरूण आपल्या अभिनव कल्पनांच्या आधारे स्टार्टअप सुरु करून रोजगार देणारे बनू लागले आहेत. परंतु २०२४ या आर्थिक वर्षात स्टार्टअपला मिळणारे फंडिंग मागील वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी घटले आहे. 

‘वेल्थ ३६० वन’ या संस्थेच्या ‘इंडिया इन्व्हेस्ट्स’ या अहवालातून ही बाब समोर आली आहे. २०२१ मध्ये स्टार्टअपना फंड देण्यासाठी दररोज उद्योजकांकडून ६ करार केले जात. हीच संख्या आता घटून तीनवर आली आहे. स्टार्टअपची वाढ झाल्यास सामान्यपणे २.५ कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा मोठे करार केले जात असतात. परंतु या व्यवहारांमध्ये घट झाली आहे. यातून स्टार्टअप कंपन्यांकडे कमी गुंतवणूक येत असल्याचे दिसते. 

देशात सध्या किती स्टार्टअप कंपन्या ?nवाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात ३४९.६७ अब्ज डॉलर्स इतके भांडवली मूल्य असलेल्या १११ यूनिकॉर्न आहेत. यातील १०२.३० अब्ज डॉलर्स इतके मूल्य असलेल्या ४५ यूनिकॉर्न २०२१ मध्ये तयार झाल्या. n२९.२० अब्ज डॉलर्स इतके मूल्य असलेल्या २२ यूनिकॉर्न २०२२ मध्ये तयार झाल्या. या दोन वर्षाच्या तुलनेत भारतात २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला यूनिकॉर्नचा दर्जा मिळू शकला. nसध्या भारतात १.७ लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. या कंपन्यांनी एकत्रितपणे १२ लाख हून अधिक जणांना नोकऱ्या दिल्या आहेत.

टॅग्स :नोकरी