शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल: शिवसेना अन् भाजपानं आयात केलेल्या 19 उमेदवारांचा लाजिरवाणा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 16:06 IST

विधानसभा निवडणुकाचा कल जवळपास हाती आलेला आहे.

मुंबईः विधानसभा निवडणुकाचा कल जवळपास हाती आलेला आहे. भाजपाच्या चौफेर उधळलेल्या वारूला जनतेनं लगाम घातला असून, त्यांची घोडदौड 100 जागांच्या आसपास थांबण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगा भरती सुरू होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार सेना-भाजपानं फोडून स्वतःच्या पक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सेना-भाजपानं आयात केलेल्या एकूण 35 आयारामांपैकी 19 जणांचा पराभव झालेला आहे. त्यातील शिवसेनेचे 11 आणि भाजपाच्या 8 आयाराम उमेदवारांचा समावेश आहे. या निकालानंतर शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची अब की बार 220 पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांना जनतेनं पराभूत केले. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या समीकरणाबद्दल सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच ठरवणार आहे, असं पवार म्हणाले आहेत.तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधीच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा-विदर्भातील अनेक नेत्यांनी सेना-भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांनी सेना-भाजपात प्रवेश केल्यानं आघाडी काहीशी खिळखिळी झाली होती. त्यात मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, दिलीप सोपल, सचिन अहिर यांच्यासह अनेक नेत्यांनी युतीतल्या शिवसेना-भाजपा पक्षात प्रवेश केला होता. पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे काँग्रेस-आघाडीचा निवडणुकीत एवढा प्रभाव राहणार नाही, अशी चर्चा होती. पण त्यातच यातील काही आयात उमेदवारांना सेना-भाजपानं उमेदवारी दिली असून, 'त्या' आयारामांना जनतेनंच चांगला धडा शिकवला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019