शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 23:38 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह याबाबत भाष्य केले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेनेचे नाव हे बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेले आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहायला हवे होते, असं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. आज सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. आता अमित ठाकरे यांनीही याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट

मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना शिवसेनेचे चिन्ह आणि नाव यावर भाष्य केले. चिन्ह आणि नावाबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले, हे नाव आणि चिन्ह बाळासाहेब यांचे आहे. ते त्यांचेच रहायला पाहिजे होते असे मला वाटते कारण त्यांनी ते कमावलेले होते. लोकांच्या मतावर कमावले होते, त्याला हात लावायला नको होता. ते ठाकरेंकडे असालया हवे होते. असं कुणाबाबतीत घडले नाही पाहिजे असंही मला वाटते, असेही अमित ठाकरे म्हणाले. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

... तर महायुतीसोबत जाणार  

 अमित ठाकरे म्हणाले, निवडणुकीनंतर आमचं महायुतीसोबत जुळू शकतं. आम्हाला भाजपासोबत जायला आवडेल. राज ठाकरे आणि भाजपाचे जुने संबंध आहेत. मनसेच्या शंभर जागा येतील, असंही ठाकरे म्हणाले. आता कोणाच्या किती जागा येतील सांगता येत नाही, राजकारणाची सगळी खिचडी झाली आहे. २०१९ ला राजकारणात गोंधळ झाला तेव्हापासून राजकारणाची खिचडी झाली आहे. २०१९ ही त्याची सुरुवात होती, असंही ठाकरे म्हणाले. शिवसेनेची ४० आमदार बाळासाहेबांच्या विचाराने चालत होते, ते आमदार काँग्रेससोबत काम करत होते. त्यांचा हा मोठा निर्णय होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत असा मोठा निर्णय घेतला. पण यात चिन्ह आणि शिवसेनेच्या नावाचा झाले तेल चुकीचे आहे. ते त्यांच्याकडेच रहायला हवे होते, असं स्पष्ट मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Thackerayअमित ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना