शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Vidhan Sabha 2019: भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा अडसर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:24 AM

घटस्थापनेपर्यंत चालणार चर्चांचे गुऱ्हाळ; त्यानंतर साधला जाईल मुहूर्त

- गौरीशंकर घाळे / मनोहर कुंभेजकर मुंबई : ‘आमचं सगळ काही ठरलंय’ असा दावा भाजप आणि शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांकडून केला जात असला, तरी युतीच्या घोषणेचा मुहूर्त मात्र पुढेच जात आहे. युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा आणि संभाव्य बंडखोरीचा अडसर असल्याचे समजते. घटस्थापनेपर्यंत युतीच्या चर्चेचे गुºहाळ चालणार असे दिसते.२९ सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. तत्पूर्वीचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात टाळण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. त्यामुळे युतीबाबतचे सोपस्कार आठवड्याभरात पूर्ण करून घटस्थापनेलाच घोषणा केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, २०१४ साली घटस्थापनेच्या दिवशीच युती तुटली होती आणि शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते. यावेळी मात्र एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, अशी युतीच्या नेत्यांची भूमिका आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, तीन-चार दिवसांत सर्वच बाबी नक्की केल्या जातील. पितृपंधरवडा संपला की, घटस्थापनेचा मुहूर्त साधत युतीची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुहूर्त, पंचांगावर दोन्ही बाजूच्या नेत्यांचा विश्वास आहे. शिवाय, घोषणा करताना संख्याशास्त्राचाही विचार केला जाणार असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली.त्यांना संधी मिळणार नाहीरविवारी अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. याच दौºयात युतीची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची संधी आहे. घटस्थापनेला युतीची घोषणा केल्यानंतर पुढील दोन-चार दिवसांत टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातील. त्यामुळे ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांना टोकाचा निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळणार नाही, असाही तर्क दिला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना