शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: ३० टक्के आमदारांची कामगिरी खराब, तरी १० आमदारांचंच तिकीट कापणार

By यदू जोशी | Updated: September 23, 2019 11:12 IST

भाजपची रणनीती; बहुतेक आमदारांना पुन्हा संधी

- यदु जोशी

मुंबई : राज्यातील भाजपच्या ३० टक्के आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे रिपोर्ट कार्ड काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हातात देण्यात आले होते. असे असले तरी प्रत्यक्षात १० ते १२ विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
२०१४ मध्ये भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते. त्यातील अनिल गोटे आणि आशिष देशमुख यांनी आधीच आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा दिला आहे. आमदार असलेले गिरीष बापट, उन्मेष पाटील हे खासदार झाले. त्यामुळे आता भाजपचे ११८ आमदार आहेत. यापैकी १० ते १२ आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. याचा अर्थ १०८ आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल. हा आकडा कोणत्याही परिस्थितीत १०० च्या खाली असणार नाही, असेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी आमदारांच्या हातात रिपोर्ट कार्ड दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तसेच पक्षसंघटनेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ते रिपोर्ट कार्ड तयार केले होते. आमदारांची कामगिरी, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची त्यांच्या मतदारसंघात कितपत प्रभावी अंमलबजावणी झाली आहे, लोकांची नाराजी कोणत्या मुद्यांवर आहे, लोकांची पसंती कोणत्या मुद्यांवर आहे असे सगळे त्या रिपोर्ट कार्डमध्ये होते. या शिवाय, कोणत्या स्पर्धकांकडून आमदारांना मोठे आव्हान भविष्यात मिळू शकते याचाही उल्लेख होता.

मुख्यमंत्र्यांनीच रिपोर्ट कार्ड हाती दिल्याने ज्यांची कामगिरी असमाधानकारक होती त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजप किमान २५ ते ३० विद्यमान आमदारांना घरी बसविणार अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, आता हा आकडा कमीतकमी असेल, असे समजते. कामगिरीसोबत इतरही निकष लावण्यात आल्याने काही जण बचावणार आहेत. त्यात जातीय समीकरणे, भाजप-शिवसेनेची युती होणे, रा. स्व. संघाच्या यंत्रणेकडून मिळालेला ‘फीडबँक’, सहा महिन्यांत आमदारांनी कामगिरीत केलेली कमालीची सुधारणा, संभाव्य विरोधी उमेदवारांमध्ये झालेले बदल अशा सगळ््या मुद्यांचा विचारही करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत सेनेला फटका
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली. त्याचा फटकाही शिवसेनेला बसला आणि आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासारखे दिग्गज पराभूत झाले होते. भाजपने विद्यमान खासदारांपैकी काहींना घरी पाठविण्याचे धाडस दाखविले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपकडून फारसे आमदार घरी पाठविले जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा