शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:08 IST

Coronavirus राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०० च्या वर गेला आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीनशेपेक्षा अधिक आहे. त्यातच निझामुद्दीनमधील तबलिगी जमातीचे कित्येक जण राज्यात परतल्यानं चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे राज्य कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलं आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.राज्यात कोरोनाचा तिसरा टप्पा सुरू झालेला नाही. आपण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात असल्याची माहिती टोपेंनी दिली. तिसऱ्या टप्प्यात समूह संसर्ग सुरू होतो. मात्र अद्याप तरी राज्यात तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. परदेशातून आलेल्या काहींना कोरोनाची बाधा झालेली आहे. तर काही जण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाली आहे. आपण अजूनही दुसऱ्याच टप्प्यात आहोत. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीच्या निझामुद्दीनमधल्या मरकजमध्ये सहभागी होऊन राज्यात परतलेल्या सगळ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. याबद्दलची माहिती पोलीस महासंचालकांकडे पोहोचली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाईल आणि उपचारांची गरज असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल, असं टोपेंनी सांगितलं. राज्यभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वेगानं वाढत आहे. त्यावर भाष्य करताना टोपेंनी वाढत्या वैद्यकीय तपासण्यांचा संदर्भ दिला. गेल्या काही दिवसांत आपण मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करत आहोत. शासकीय रुग्णालयांसोबतच काही खासगी लॅब्सनादेखील तपासण्या करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तपासण्यांचं प्रमाण वाढल्यानं रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. यामुळे सद्यस्थिती समोर येत आहे. त्यामुळे ही बाब चांगलीच आहे. कोरोनाबाधित लवकर आढळून आल्यास त्याच्यावर उपचार सुरू होऊ शकतात, असं टोपे म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे