Maharashtra News: उद्धवसेनेच्या आमदाराच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरे गायब, एकनाथ शिंदेंना स्थान
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:57 IST2026-02-05T08:37:10+5:302026-02-05T20:57:12+5:30
बुधवारी दिवसभर महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील 'महाकोंडी'. मंगळवारी गॅस टँकर उलटल्याने एक्सप्रेस ...

Maharashtra News: उद्धवसेनेच्या आमदाराच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरे गायब, एकनाथ शिंदेंना स्थान
बुधवारी दिवसभर महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय म्हणजे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील 'महाकोंडी'. मंगळवारी गॅस टँकर उलटल्याने एक्सप्रेस वे 'जॅम' झाला होता, त्यात प्रवाशांचे हाल बेहाल झाले. ही कोंडी अखेर ३० तासांनंतर फुटली आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं. या भेटीचे काही राजकीय अर्थही काढले जात आहेत. तिकडे दिल्लीत लोकसभेत गदारोळ सुरूच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल बोलता आले नाही. त्यामुळे राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेला ते आज काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. टीम इंडियाने आपलं 'टी-२० वर्ल्ड कप मिशन' दणक्यात सुरू केलं आहे. 'वॉर्म अप' मॅचमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
05 Feb, 26 : 08:56 PM
उद्धवसेनेच्या आमदाराच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरे गायब, एकनाथ शिंदेंना स्थान
उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्या एका पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि चर्चेलाही तोंड फुटले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी उद्धवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी सभा घेतली. या सभेच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंनाच स्थान दिले गेले नव्हते.

05 Feb, 26 : 08:00 PM
मुंबईच्या महापौर पदासाठी 'या' तीन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबई महापालिकेच्या महापौर पदी कोण बसणार, याचे उत्तर ११ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे. त्यासाठी आता बैठका आणि चर्चा सुरूच आहे. दरम्यान, मुंबईचा महापौर भाजपाचा असणार असल्याचे स्पष्ट झाले असून, तीन महिलांची नावे चर्चेत आहेत. राजश्री शिरवळकर, रितू तावडे आणि शीतल गंभीर या तीन महिला नगरसेवक महापौर पदासाठी स्पर्धेत असल्याची चर्चा आहे.
05 Feb, 26 : 07:17 PM
मोदींवर हल्ल्याचा कट रचत होती, शिंदेंचा नेता खवळला; काँग्रेसवर डागली टीकेची तोफ
शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. निरुपम म्हणाले, "हे वृत्त ऐकून रक्तच खवळले की, काँग्रेस लोकसभेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या खासदारांकडून हल्ला करण्याचा कट रचत होती. किती नीच विचार आहे. काँग्रेसवाले पराभवामुळे इतके निराश झाले आहे?"
"पंतप्रधानांची लोकप्रियता त्यांच्या डोळ्यात इतकी सलत आहे का की, ते सर्व सभ्यता विसरले आहेत. काँग्रेसने त्यांची तथाकथित मोहब्बत की दुकान कायमची बंद केली आहे का? लाल संविधान घेऊन काँग्रेसवाले फिरतात, त्यात हे सर्व शिकवले जाते का?", असे सवाल करत माजी खासदार निरुपम यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
05 Feb, 26 : 06:57 PM
"मोदी सरकारने ठरवून टाकले आहे की विरोधी नेत्यांना...", काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मोदी सरकारने ठरवले आहे की, विरोधी नेत्यांना बोलू द्यायचे नाही. ना लोकसभेमध्ये, ना राज्यसभेमध्ये. आमचे मोठमोठे नेते ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. जे देशासाठी लढले, तुरुंगात गेले आणि इंग्रजांविरोधात लढून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या नेत्यांविरोधात एक माणूस सभागृहात बोलतो. त्याला माईक दिला जातो. तो मनमानी शिव्या देतो आणि सरकार मौन बाळगते. भाजपाने याचा निषेध केला आहे का?", असा सवाल मल्लिकार्जून खरगे यांनी केला.
"सर्व विरोधी पक्षांनी असे ठरवले होते की, जर ते आम्हाला बोलू देणार नसतील, तर आपण सभात्याग करायला हवा. निदर्शने करायला हवी. आमच्या नेत्यांचा जो अपमान केला गेला, त्याचा आम्ही निषेध करतो", असे मल्लिकार्जून खरगे म्हणाले.
05 Feb, 26 : 06:05 PM
विरोधकांनी राष्ट्रपतींचा नाही, संविधानाचा अपमान केला -पंतप्रधान मोदी
"काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होऊ शकली नाही. राष्ट्रपती पदाचा अपमान आहे. त्यांना संविधान शब्दाचा उच्चार करण्याचा अधिकार नाही. गरिबीतून वर आलेली एक महिला. आदिवासी कुटुंबातून आलेली एक महिला. जो व्यवहार तुम्ही लोकसभेत केला आहे, तुम्ही आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. महिलेचा अपमान केला. संविधानाने ज्यांना सर्वोच्च पदावर बसवले आहे, तुम्ही त्यांचा अपमान केला आहे. तुम्ही संविधानाचा अपमान केला आहे", अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर केली.
05 Feb, 26 : 05:19 PM
पंतप्रधान मोदींचे राज्यसभेत उत्तर, सभात्याग करताच विरोधकांना सुनावले
"जे लोक थकले, ते बिचार निघून गेले. पण, कधी ना कधी त्यांना उत्तर द्यावे लागेल की, देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता. त्यांनी प्रयत्न केले असतील, ते देशांमागे फिरले असतील", असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना राज्यसभेत उत्तर देताना सुनावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अमेरिका, युरोपियन यूनियनसोबतच्या व्यापार कराराचाही उल्लेख केला.
पंतप्रधान मोदींचे संपूर्ण भाषण
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/MelS1S0NF2
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
05 Feb, 26 : 05:18 PM
पतप्रधान मोदींचं भाषण सुरू, विरोधकांची घोषणाबाजी सुरूच
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप करत आज सकाळपासून राज्यसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज तहकूबही करावं लागलं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर निवेदन करत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच आहे. लोकसभेतील गोंधळामुळे काल तिथे पंतप्रधानांचं निवेदन होऊ शकलं नव्हतं. आता मोदी आपल्या भाषणातून विरोधकांना प्रत्युत्तर देणार का, काय बोलणार, याबद्दल उत्सुकता आहे.
VIDEO | Delhi: PM Narendra Modi (@narendramodi) delivers Motion of Thanks on President's address in Rajya Sabha amid opposition sloganeering.
— Press Trust of India (@PTI_News) February 5, 2026
He says, “The President has elaborately presented India’s progress in Parliament, covering the middle class, lower middle class, the… pic.twitter.com/TBi7X8CfL3
05 Feb, 26 : 05:10 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेतून LIVE. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर निवेदन...
05 Feb, 26 : 04:54 PM
अंजली दमानियांवर आमदार अमोल मिटकरी भडकले; म्हणाले, "या कठीण काळात..."
अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना थेट पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरच शंका घेतली. त्यांच्या विधानावर आमदार अमोल मिटकरी संतापले.
आमदार मिटकरी म्हणाले, "अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत. अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, माध्यमांशी संवाद साधताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रयत्न आहे."
"या कठीण आणि भावनिक काळात शब्दांचा विपर्यास करून वातावरण दूषित करण्याऐवजी, दुःखात सहभागी होणे अपेक्षित होते. तथ्यांशिवाय आरोप करणे हे ना माणुसकीला शोभतं, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला… अंजली दमानिया आपल्या असंवेदनशिलतेचा निषेध व धिक्कार", अशा शब्दात अमोल मिटकरींनी दमानियांना सुनावले.
अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 5, 2026
माननीय अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, माध्यमांशी संवाद साधताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित प्रयत्न आहे.
या कठीण आणि भावनिक…
05 Feb, 26 : 03:55 PM
संसद गदारोळावर बावनकुळेंचा घणाघात; काँग्रेस ‘मेंटली रिटायर्ड’ असल्याची टीका
संसद गदारोळावर बावनकुळेंनी टीका केली. काँग्रेसचे हे लक्षण डोक्यात फरक पडल्यासारखे आहे. ते मेंटली रिटायर्ड झाल्यासारखे वागत आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.“त्यांच्या बुद्धीची कीव येत आहे. एकीकडे संपूर्ण जगात नरेंद्र मोदी यांना मान्यता मिळत असताना, संसदेच्या लोकमंदिरात अशा प्रकारचे निदर्शन करणे, अशी कृती करणे हे लोकशाहीला मान्य नाही,” असे बावनकुळे म्हणाले.
05 Feb, 26 : 03:30 PM
उपमहापौर पदासाठी पप्पू देशमुख यांचा अर्ज; चंद्रपूरमध्ये आघाडीत तणाव
जनविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत जनविकास सेनेचे एमआयएमसह चार नगरसेवक असून, निवडणूकपूर्व आघाडीनुसार उपमहापौर पदाची अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसकडून वसंता देशमुख यांच्या नावाची घोषणा झाल्याने आघाडीत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
05 Feb, 26 : 03:26 PM
जोगेश्वरी पंप हाऊस,आघाडी नगर येथील एका इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग
मुंबई-जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेतील पंप हाऊस आघाडी नगर येथील एका इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आज दुपारी एकच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागण्याची गंभीर घटना घडली. या आगीत तीन घरे तसेच दोन चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
05 Feb, 26 : 03:13 PM
चंद्रपुरात ठाकरे गटाच्या मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर पदासाठी भरला अर्ज
चंद्रपुरात ठाकरे गटाच्या मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर पदासाठी अर्ज आहे. चंद्रपुरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जास्त आहेत. पण, काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी दिसत आहे.
05 Feb, 26 : 02:47 PM
सुनेत्रा अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. परंतु, आता सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत राज्यपालांना एक पत्र देण्यात आले आहे. यावर आता राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (सविस्तर बातमी वाचा)
05 Feb, 26 : 02:15 PM
जोगेश्वरी पंप हाऊस,आघाडी नगर येथील एका इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग
मुंबई-जोगेश्वरी (पूर्व) विधानसभेतील पंप हाऊस आघाडी नगर येथील एका इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आज दुपारी एकच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागण्याची गंभीर घटना घडली. या आगीत तीन घरे तसेच दोन चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
05 Feb, 26 : 01:53 PM
शशी थरूर व्हीलचेअरवरून संसदेत पोहोचले
काँग्रेस नेते खासदार शशी थरूर हे काल संसदेच्या पायऱ्यांवरून घसरून पडले होते. मोबाईलवर बोलत-बोलत पायऱ्या उतरताना त्यांचा तोल गेला होता. त्यानंतर आज ते व्हीलचेअर बसून संसदेत आले.
Delhi: Congress MP Shashi Tharoor arrives at Parliament House in a wheelchair pic.twitter.com/IcfvwiOrtw
— IANS (@ians_india) February 5, 2026
05 Feb, 26 : 01:44 PM
सत्ताधाऱ्यांकडून वारेमाप खोटी आश्वासने; माजी आमदार वैभव नाईकांची टीका
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला आज वेगवेगळी खोटी आश्वासनं द्यावी लागत आहेत. या विभागाचे खासदार, आमदार आणि पालकमंत्री हे महायुती सरकारमध्ये असतानाही जिल्ह्यात प्रत्यक्षात विकासकामे झालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजही केवळ खडी टाकली जाते, आजही रस्ता केल्याचं आश्वासन दिले जाते, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.
05 Feb, 26 : 01:24 PM
दादांच्या विचारांना पाठिंबा द्या; उमेदवारांना निवडून द्यावी हीच खरी आदरांजली – रोहित पवार
२९ तारखेला दुर्दैवी घटना घडली. त्या वेळीही दादा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी निघाले होते. अजित दादा ज्या विचारांना पुढे नेत होते, त्या विचारांना नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशी मी विनंती करतो. दादांना आदरांजली द्यायची असेल, तर त्यांच्या उमेदवारांना जनतेने साथ द्यावी, असे कुटुंबातील सदस्य म्हणून मी आवाहन करतो, असंही आमदार रोहित पवार म्हणाले.
05 Feb, 26 : 01:20 PM
मुंबईतील १२० घरांसाठीची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर
मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर काढण्यात आलेल्या १२० घरांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ पासून ही नोंदणी सुरू होणार होती, मात्र तांत्रिक कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे. (अधिक वाचा)
05 Feb, 26 : 12:56 PM
मुंबईच्या महापौर, उपमहापौरांसाठी 'हायब्रिड' गाड्या
मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. महापौरांना नवीन कोरी 'इनोव्हा एन', तर उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी 'स्कॉर्पिओ' वाहने महापालिका प्रशासनाकडून दिली जाणार आहेत. (अधिक वाचा)
05 Feb, 26 : 12:44 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता राज्यसभेत बोलणार, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार
Budget session of Parliament | PM Narendra Modi will speak in the Rajya Sabha around 5 pm today.
— ANI (@ANI) February 5, 2026
05 Feb, 26 : 12:41 PM
१२ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला यश मिळेल: चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजपला यश मिळेल. भाजप व महायुतीला बहुमत मिळेल. मराठवाड्यातील जनता भाजप आणि महायुतीच्या पाठीशी उभी आहे. जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत आली, तर योजनांचा थेट फायदा जनतेला होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
05 Feb, 26 : 12:25 PM
नवी मुंबई महापालिकेत हालचालींना वेग; शिवसेना–भाजप नगरसेवक कार्यालयात दाखल
शिवसेना–भाजपचे नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला आहे.
05 Feb, 26 : 11:58 AM
लोकसभेतील गोंधळावरून राज्यसभेतही वाक्-युद्ध!
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही, सरकार नेमकं काय लपवतंय? पंडित नेहरू लोकशाहीवादी होते. हे सरकार लोकशाही चिरडण्याचं काम करतंय - राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल.
लोकसभेतील मुद्दा राज्यसभेत उपस्थित करता येत नाही, विरोधकांनी लोकसभा चालू दिली नाही - केंद्रीय मंत्री जेपी नड्डा
लोकसभा सभापतींनी ४० मिनिटांची वेळ दिली होती. वारंवार बोलण्याची संधी दिली होती. मात्र, संसद विरोधकांच्या मर्जीने नाही, तर नियमांनुसार चालेल - संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू
राज्यसभा में बोलते हुए केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू ने कहा, "आज हम सभी उम्मीद करते हैं कि सभी सांसद सदन के नियमों और परंपराओं का पालन करेंगे। सभी सांसद आज प्रधानमंत्री का भाषण सुनने का इंतजार कर रहे हैं। आपके लोकसभा में विपक्ष के नेता सदन के नियमों का पालन नहीं… https://t.co/0xt8ZFvskkpic.twitter.com/CNQgGua7uF
— ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2026
05 Feb, 26 : 11:34 AM
"जिथे पार्थिव ठेवलं होतं, तिथेच विलीनीकरणाची चर्चा का, कशासाठी?"
"अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना त्याच प्रांगणात विलीनीकरणाची चर्चा कोणी, कशी, कशासाठी केली? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर कोणाची घाई कशासाठी होती? ते स्पष्ट होईल" - सुनील तटकरेंचा पलटवार
05 Feb, 26 : 11:31 AM
तातडीने शपथविधी का झाला?; सुनील तटकरे म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडीची बैठक आम्ही तीन दिवसाच्या दुखवट्यानंतर चौथ्या दिवशी बोलावली. दादा विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे ही निवडीची प्रक्रिया करावी लागली. यात गैर काय? आम्ही सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली, त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विनंती करून सुनेत्रा पवार यांना शपथ दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी तातडीने झाला वगैरे म्हणण्याचा प्रश्न येतच कुठे?- सुनील तटकरेंचा प्रतिप्रश्न
05 Feb, 26 : 11:24 AM
मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, त्याआधी...; राज ठाकरेंचा टोला
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे. परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा. ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2026
मंगळवार ३… pic.twitter.com/2RA5yxOG0Z
05 Feb, 26 : 10:44 AM
आज सुनील तटकरे हे शरद पवार यांना मार्गदर्शन करताहेत, संजय राऊत यांचा खोचक टोला
आज सुनील तटकरे हे शरद पवार यांना मार्गदर्शन करताहेत, शरद पवार यांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ला देऊ लागले आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणावरून सुरू असलेल्या घडामोडींवरून लगवाला आहे.
05 Feb, 26 : 10:40 AM
मुंबईत भाजपाचा महापौर बसणं हा मुंबईसाठी काळा दिवस असेल, संजय राऊत यांची टीका
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर येणं हा मुंबईसाठी आणि १०६ हुतात्म्यांसाठी काळा दिवसं असेल, असं विधान उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
05 Feb, 26 : 10:29 AM
बैठका-भेटींचं सत्र सुरूच; पवार कुटुंब आज पुन्हा विद्या प्रतिष्ठानमध्ये...
विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून अजित पवार यांच्या जागी कुणाची नियुक्ती करायची, हे ठरवण्यासाठी पवार कुटुंबीयांची आज पुन्हा बैठक होतेय. त्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचले असून थोड्याच वेळात पार्थ आणि जय पवारही या बैठकीत सहभागी होणार आहेत. शरद पवार यांनी काल अजितदादांच्या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं होतं. त्यामुळे आजच्या चर्चेत नेमके काय काय निर्णय होतात, याकडे लक्ष लागलं आहे.
05 Feb, 26 : 10:08 AM
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात
गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातील कल संमिश्र पाहायला मिळाला. यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मेटल, रियल्टी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव दिसून आला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स १५० अंकांनी तर निफ्टी ७० अंकांनी घसरला.
05 Feb, 26 : 10:04 AM
सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार... बिनविरोध!
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाकडे सोपवायचं, हा प्रश्न निर्माण झाला. त्यावरून राजकीय वर्तुळात बरीच उलटसुलट चर्चा झाली. अर्थातच, बहुतेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह धरला होता. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दोनच दिवसांपूर्वी, आपण या शर्यतीतच नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता, सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
05 Feb, 26 : 09:35 AM
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा वाहतूक कोंडी, लोणावळ्याजवळ सिमेंट कंटेनर पडला बंद
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील वायूचा टँकर पडून ३३ तास बाधित झालेली वाहतूक अखेर मध्यरात्री २ सुमारास सुरू करण्यात आली होती. मात्र आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याजवळ सिमेंट कंटेनर बंद पडल्याने महामार्गावर पुन्हा एकदा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
05 Feb, 26 : 09:26 AM
कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील ओढ्याच्या पुलाजवळ कांद्याची वाहतूक करणार ट्रक पहाटेच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
05 Feb, 26 : 08:56 AM
उद्धवसेना मुंबई मनपा महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची शक्यता
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उद्धवसेना मोठं पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. उमेदवार देण्याबाबत आज मातोश्रीवर निर्णय होण्याची शक्यता
05 Feb, 26 : 08:46 AM
बेसमेंट, पार्किंग स्वतंत्र युनिट म्हणून विकू शकत नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
तळघर (बेसमेंट) आणि पार्किंग क्षेत्रे ही सामायिक सुविधा (कॉमन ॲमेनिटीज) असल्याने ती स्वतंत्र युनिट्स म्हणून विकता येणार नाहीत किंवा त्याच्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व मागता येणार नाही, असे मुंबईउच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.