म्हाडाचा घरखरेदी इच्छुकांना झटका! मुंबईतील १२० घरांसाठीची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:10 IST2026-02-05T13:08:34+5:302026-02-05T13:10:03+5:30

MHADA Mumbai 120 Flats for Sale: म्हाडाने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील विविध गृहनिर्माण वसाहतींमधील १२० घरांची विक्री जाहीर केली होती. यासाठीची जाहिरात ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

Mhada FCFS 2026: MHADA's shock to homebuyers! Registration process for 120 houses in Mumbai delayed; Know the reason | म्हाडाचा घरखरेदी इच्छुकांना झटका! मुंबईतील १२० घरांसाठीची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर; जाणून घ्या काय आहे कारण

म्हाडाचा घरखरेदी इच्छुकांना झटका! मुंबईतील १२० घरांसाठीची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई: मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर काढण्यात आलेल्या १२० घरांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया तूर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी २०२६ पासून ही नोंदणी सुरू होणार होती, मात्र तांत्रिक कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे.

म्हाडाने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील विविध गृहनिर्माण वसाहतींमधील १२० घरांची विक्री जाहीर केली होती. यासाठीची जाहिरात ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. वेळापत्रकानुसार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी आणि माहितीपुस्तिका उपलब्ध होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया वेळेत सुरू होऊ शकणार नाही, असे स्पष्टीकरण म्हाडा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

घरे कुठे आहेत? 
या योजनेअंतर्गत कांदिवली, चारकोप, शिंपोली, अ‍ॅन्टॉप हिल, वडाळा, पवई, मालाड, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परेल, सायन, जुहू आणि अंधेरी अशा मोक्याच्या ठिकाणी ही १२० घरे उपलब्ध आहेत. ही ती घरे आहेत जी आधीच्या लॉटरीमध्ये काही कारणास्तव विकली गेली नव्हती.

पुढील तारीख कधी जाहीर होणार? 
म्हाडाने अर्जदारांना आवाहन केले आहे की, नोंदणी प्रक्रियेच्या सुधारित तारखा लवकरच अधिकृत वेबसाइटवर आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केल्या जातील. त्यामुळे इच्छुकांनी गोंधळून न जाता म्हाडाच्या अधिकृत पोर्टलवर (https://bookmyhome.mhada.gov.in/) लक्ष ठेवावे.

Web Title: Mhada FCFS 2026: MHADA's shock to homebuyers! Registration process for 120 houses in Mumbai delayed; Know the reason