शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : मुनगंटीवारांनी नारायण राणेंची हवाच काढली, सत्ता स्थापनेचा दावा म्हणजे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:03 IST

शिवसेनेने शेतकऱ्यांना आश्वासने दिली आहेत. शेतीही पाहून आले आहेत. पण त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे

मुंबई - भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सत्तास्थापनेचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. मात्र, मुनंगटीवार यांनी राणेंची हवाच काढून घेतल्याचं दिसून येतंय. 

पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी “नारायण राणे यांचं सरकार स्थापनेविषयीचं मत त्यांचं व्यक्तिगत मत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही,” असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपाला मदत करणे माझे कर्तव्य आहे. सत्तास्थापनेसाठी जे करावे लागेल ते करेन, आम्ही प्रयत्न करू, असे राणेंनी म्हटले होते. तसेच, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाईल असे मला वाटत नाही, असेही राणे यांनी म्हटले होते.

शिवसेनेने शेतकऱ्यांना आश्वासने दिली आहेत. शेतीही पाहून आले आहेत. पण त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे, असे मला वाटते. भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा 145 आमदारांची यादी असेल रिकाम्या हाताने जाणार नाही, असा टोला राणेंनी शिवसेनेला लगावला. शिवसेना नैतिकतेला धरून वागली नाही. महायुतीमध्ये बहुमत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. ते शिवसेनेला उल्लू बनवत आहेत. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. युती म्हणजे वचन असते ते शिवसेनेने पाळले नाही, असा आरोपही राणेंनी केला होता. तसेच, राणेंनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचंही म्हटलं होतं. मात्र, सुधीर मुनगंटीवारांनी राणेंच्या वक्तव्याचा भाजपाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय.  दरम्यान, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस