Lokmat Poll: मुख्यमंत्रिपदासाठी तुमची पसंती कुणाला?... मत अवश्य नोंदवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 14:54 IST2019-11-21T14:53:20+5:302019-11-21T14:54:23+5:30
शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, यावर चर्चा सुरू झाली आहे.

Lokmat Poll: मुख्यमंत्रिपदासाठी तुमची पसंती कुणाला?... मत अवश्य नोंदवा!
महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून शिवसेनेसह सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जवळपास एकमत झालं आहे. शरद पवार यांच्याकडे बुधवारी साडेतीन तास झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यामुळे आता शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सूचित केलं आहे. मात्र त्याचवेळी, एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते असल्यानं त्यांचं नावही चर्चेत आहे.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्रिपदासाठी महाराष्ट्राच्या जनतेची पसंती कुणाला, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...