शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'पक्षातील निष्ठावंतांना विचारुनच आम्ही मेगाभरती नव्हे तर मेरीट भरती करू' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 16:39 IST

भाजपची विचारधारा व आमची विचारधारा वेगळी आहे.आम्ही कधीही त्यांच्या बरोबर जाणार नाही

पुणे - राज्यातील सत्तास्थापनेत विरोधी बाकांवर बसायला तयार असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने सत्तेत बसणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाला रामराम करून भाजपात भरती झालेले आणि आमदार असलेले अनेक जण राष्ट्रवादीशी संपर्क साधत आहे. भाजपाचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र त्यांचे नाव आता मी जाहीर करणार नाही, त्यांच्यासाठी ते अडचणीचं होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 

सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आज पुण्यात बैठक आयोजित केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, भाजपामध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमदारही आमच्या संपर्कात आहेत. मात्र आम्ही मेगा भरती करणार नाही तर मेरीट भरती करणार आहोत. सध्या पक्ष यशाच्या शिखरावर आहे. पण ही भरती करत असताना तेथील स्थानिक लोकांना, पक्षातील निष्ठावंतांना आणि नवीन तरुण मंडळींना विचारत घेऊन निर्णय घेणार आहोत असं सांगितले आहे. 

तसेच भाजपची विचारधारा व आमची विचारधारा वेगळी आहे.आम्ही कधीही त्यांच्या बरोबर जाणार नाही. यावेळी पाटील यांना शिवसेनेबरोबर कसे काय असे विचारले असता, दगडापेक्षा वीट मऊ असे उत्तर देऊन त्यांनी, जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण तेही स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या नेत्यांच्या बैठकीत तयार झालेल्या किमान समान कार्यक्रमातील काही मुद्द्यावर काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना आक्षेप आहे. शरद पवारांशी भेट झाल्यानंतर या बैठकीत ते या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक यशस्वी झाली तर शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 

भाजपाशिवाय कोणाचं सरकार येणार नाही दादरमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक गेल्या तीन दिवसांपासून सुरु होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाशिवाय राज्यात कोणाचं सरकार येणार आहे. सरकार आपलचं येणार आहे असा दावा केला. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हा दावा केला.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा