Maharashtra Election Exit Poll: All 'exit polls' of Maharashtra Vidhan Sabha Election on one click | Maharashtra Election Exit Poll : विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर
Maharashtra Election Exit Poll : विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

ठळक मुद्दे२८८ जागांसाठी आज झालेल्या मतदानात राज्यातील ६०.५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.महाराष्ट्रात 'फिर एक बार, देवेंद्र सरकार' येणार असंच सगळ्या चाचण्यांचे आकडे सांगत आहेत.

मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज झालेल्या मतदानात राज्यातील ६०.५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले असून महाराष्ट्रात 'फिर एक बार, देवेंद्र सरकार' येणार असंच सगळ्या चाचण्यांचे आकडे सांगत आहेत. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती २०० जागांचा टप्पा पार करेल, असा अंदाज पाचपैकी तीन एक्झिट पोलने वर्तवला आहे, तर दोघांनी त्यांना १९०च्या घरात नेऊन ठेवलंय. यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रांच्या महाआघाडीला मतदार पुन्हा नाकारताना दिसताहेत. २०१४ चा आकडा गाठणंही त्यांना कठीण होईल, असंच एक्झिट पोल तरी सांगत आहेत.

'अब की बार २२० पार' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचा मतदानानंतर नवा आकडा!

...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

मतदानानंतर जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोलचे आकडे असेः  

एबीपी - सी व्होटर

महायुती  - १९२ ते २१६
महाआघाडी - ५५ ते ८१
इतर - ४ ते २१

.....................

इंडिया टुडे-एक्सिस

महायुती - १६६ ते १९४ 
(भाजपा १०९ ते १२४ + शिवसेना ५७ ते ७०)

महाआघाडी ७२ ते ९०
(काँग्रेस ३२ ते ४० + राष्ट्रवादी ४० ते ५०)

'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

न्यूज १८ - IPSOS

महायुती - २४३ (भाजपा १४१ + शिवसेना १०२)
महाआघाडी - ३९ (काँग्रेस १७ + राष्ट्रवादी २२)

.....................

रिपब्लिक टीव्ही - जन की बात

महायुती २१६ ते २३०
(भाजपा १३५ ते १४२ + शिवसेना ८१ ते ८८)

महाआघाडी ५० ते ५९
(काँग्रेस २० ते २४ + राष्ट्रवादी ३० ते ३५)

इतर - ८ ते १२

.....................

पोल डायरी

भाजपा - १२१ ते १२८
शिवसेना - ५५ ते ६४
काँग्रेस - ३९ ते ४६
राष्ट्रवादी - ३५ ते ४२
इतर - ३ ते २७

.....................

टाइम्स नाऊ 

महायुतीः २३० 
महाआघाडीः ४८ 
इतरः १०

Web Title: Maharashtra Election Exit Poll: All 'exit polls' of Maharashtra Vidhan Sabha Election on one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.