शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'मोदींच्या सभेसाठी झाडं तोडण्यावरून इतका गहजब करण्याचं कारण काय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 23:00 IST

पुण्यात होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी जवळपास २० झाडांवर कुऱ्हाड

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या पुण्यात होणाऱ्या सभेसाठी काल झाडं तोडण्यात आली. यावरुन भाजपा सरकारवर जोरदार टीका झाली. त्यावर भाष्य करताना मोदींच्या सभेसाठी झाडं तोडण्यावरून इतका गहजब करण्याचं कारण काय, असा प्रश्न केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला. याआधीही अनेकदा अशा प्रकारे झाडं कापण्यात आली आहेत. मात्र त्याचवेळी तोडण्यात आलेल्या झाडांपेक्षा अधिक झाडं लावण्यातदेखील आल्याचं जावडेकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा होणार आहे. यासाठी काल सर परशुराम महाविद्यालयाच्या आवारातील झाडं तोडण्यात आली. या वृक्षतोडीवरुन भाजपावर जोरदार टीका झाली. याबद्दल बोलताना जितकी झाडं तोडली जातात, त्यापेक्षा अधिक लावली जातात. तसा वन विभागाचा नियमच आहे, अशा शब्दांमध्ये जावडेकर यांनी सरकारचा बचाव केला.मोदींच्या सभेसाठी झाडं तोडली गेली, त्यावरुन इतका गहजब करण्याचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतरांच्या सभांसाठीदेखील झाडं तोडली जातात. याआधीच्या पंतप्रधानांच्या सभांसाठीदेखील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. त्यावेळी इतकी जागरुकता का नव्हती असा प्रश्न मला पडतो, असं जावडेकर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी व्यासपीठाच्या जवळ असणारी आणि सुरक्षेला अडथळा आणणारी जवळपास 20 झाडं काल तोडण्यात आली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता झाडं नव्हे, फांद्या तोडण्यात आल्याचा अजब दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केला. 'फांद्या तोडण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली होती. तशी रितसर परवानगी मिळाल्यानंतरच फांद्या तोडण्यात आल्या,' असं महापौर म्हणाल्या. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकर