शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 20:57 IST

राज ठाकरेंकडून शिवसेना, भाजपाचा समाचार

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राजीनाम्यांच्या इशाऱ्यावरुन शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. पैशांची कामं अडल्यावर शिवसेनेकडून राजीनाम्याच्या धमक्या दिल्या जायच्या. शिवसेनेच्या धमक्या सर्वसामान्यांसाठी नव्हे, तर केवळ आणि केवळ पैशांसाठी होत्या. हेच करून यांनी पाच वर्ष जनतेला मूर्ख बनवलं, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. ते मागाठाणेत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात शिवसेना, भाजपावर तोफ डागली. शिवसेना, भाजपाच्या बॅनरवर हीच ती वेळ असा मजकूर आहे. मग पाच वर्षे वेळ नव्हती का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यावरदेखील राज यांनी टीका केली. 'आरेमधील झाडं कापू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका होती. तिथली झाडं एका रात्रीत कापून झाली. त्यानंतर आमचं सरकार आलं की आरेला जंगल म्हणून घोषित करू असं शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात. आता आरेला जंगल घोषित करून करणार काय? तिथे गवत लावणार का?', असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले.यावेळी रस्त्यांमधल्या खड्ड्यांवरही राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले. 2014 मध्ये शिवसेनेनं रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल त्यांनी विचारला. सध्या सिटी बँक अडचणीत आली आहे. ती शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची आहे. या प्रश्नात शिवसेनेनं काय केलं. आरे असो वा अडचणीत सापडलेली बँक, याबद्दल शिवसेनेच्या जाहीरनाम्यात एक शब्दसुद्धा नाही, असं म्हणत राज यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा