शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Maharashtra Election 2019: 'वयानं लहान असलो, तरी आखाड्यातले वस्ताद आहोत'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 9:27 PM

कुस्तीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा पवारांना टोला

मुंबई: गेल्या ५ वर्षात प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाल्यावर आता काही जणांना आम्ही लहान वाटू लागलो आहोत. त्यामुळे आता लहान मुलांशी लढत नाही, असं ते म्हणू लागलेत. मात्र आम्ही वयानं, अनुभवानं लहान असलो, तरीही आखाड्यातले वस्ताद आहोत, हे आता त्यांना समजलंय, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. ते मुंबईतील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.राष्ट्रवादी आणि शरद पवारांची अवस्था आता शोलेतील जेलरसारखी आहे. आधे इधर जाओ.. आधे उधर जाओ.. बाकी मेरे पीछे आओ.. त्यांच्या पक्षात आता नेतेच उरलेले नाहीत. राष्ट्रवादी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेकदा अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या मागितल्या जातात. मात्र राष्ट्रवादी अनुकंपा तत्त्वावर मतं मागतेय. आमच्यावर ईडीची कारवाई होतेय. आम्हाला मतं द्या असं म्हणण्याची वेळ पवारांवर आली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पवारांवर बरसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आणि केंद्र सरकारच्या मदतीमुळे गेल्या ५ वर्षात मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी झाली. शहरात सध्या मेट्रोचं जाळ उभारलं जातंय. कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ वर्षांमध्ये मुंबई देशातलं क्रमांक एकचं शहर होईल, असं फडणवीस म्हणाले. गेल्या ५ वर्षांमध्ये महायुतीनं पारदर्शक कारभार केला आहे. गुंतवणुकीत, उद्योगात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान मोदी नवा भारत घडवत आहेत. आपण नवा महाराष्ट्र घडवू. त्यासाठी महायुतीला भरभरुन मतदान करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा