शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: बंडखोर उभे करणं हे भाजपाचं यंत्र की षडयंत्र?; शिवसेना नेत्याने व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 10:11 IST

आमची चूक दाखवा, आम्ही फक्त नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना पाहून काम केलं.

जळगाव - विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवित असले तरी बंडखोर उमेदवारांनी युतीच्या उमेदवारांची डोकेदुखी केली आहे. जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्याविरोधात भाजपाने बंडखोर उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे नाराज गुलाबराव पाटलांनी भाजपाविरोधात शंका उपस्थित केली आहे. 

माध्यमाशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की,  बंडखोरांना आवारलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, लोकसभेत आम्ही त्यांचे काम केलं तसं विधानसभेत भाजपा कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं पाहिजे. बंडखोर ऐकत नाही असं सांगतात. नेत्यांच्या शब्दांना मान ठेवायला हवं होतं. लोकसभेत आमचे कार्यकर्तेही ऐकत नव्हते पण आम्ही त्यांना समजावलं. ९ दिवसांत खासदार निवडून दिला. ५ वर्ष जो माणूस इथं मेहनत करतो, शेवटी राजकारण आमचं करिअर आहे. तोंडी घास येताना तुम्ही अशी नाटकं करता अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली आहे. 

तसेच आमची चूक दाखवा, आम्ही फक्त नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना पाहून काम केलं. मात्र त्यांचे तसं नाही, बंडखोर उभे राहिलेच कसे? आम्ही जळगाव, भूसावळ म्हणजे उमेदवार उभे केले असते. आम्ही एका बापाची औलाद आहोत, प्रामाणिक काम करतो. हे भाजपाचं यंत्र आहे की षडयंत्र हे माहित नाही अशी शंका गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केली. 

दरम्यान, भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवतायेत हे राजकारणात पहिल्यांदा पाहतोय. चार महिन्यांपूर्वी भाजपाचं काम आम्ही केलं पण आमच्यासोबत असं होत नाही. कोणीही विरोधात आला तरी आम्हीच निवडून येणार आहे असा विश्वास शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.  

नेमकं प्रकरण काय?जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. जळगाव ग्रामी, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यापैकी भाजपाकडून केवळ अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना केलं. मात्र तसं करता येणार नाही, असं महाजन यांनी सांगताच, दोघांमध्ये वाद सुरू झाला. सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि छायाचित्रकार तो टिपत होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस