शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:15 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - कवी कुसमाग्रजांची कविता पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा या कवितेचा संदर्भ घेत सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी काही तासात संपणार आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने विरोधकांना घायाळ केलं आहे. रम्या या काल्पनिक पात्राद्वारे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. साताऱ्यात भर पावसात शरद पवारांनी भाषण केले त्याचं कौतुक होत असताना रम्या कवितेच्या 'पावसाने' साहेबांना भिजवणार आहे. असं सांगत 'बारामतीचा कणा' नावाची कविता जाहीर केली आहे. 

कवी कुसमाग्रजांची कविता पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा या कवितेचा संदर्भ घेत सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांना इतिहास आठवताना स्व. वसंतदादा पाटील यांच्याकडे जाऊन आपलं मनमोकळं करतात.  मात्र दुखा:च्या भरात 'कणा' या कवितेतील शब्द मात्र बदलले असं सांगत पवारांवर जोरदार टीका केली आहे. 

बारामतीचा कणाओळखलं का सर मला,राज्यात आलं कुणी पक्ष होता कर्दमलेला, तुम्हालाच पाजलं होतं पाणीक्षणभर बसला, नंतर हसला, बोलला दिल्लीकडे पाहूनसोनिया बाई पाहुणी आली गेली सत्तेत राहूनइटलीवासिणीच्या इशाऱ्यावर १० वर्षे नाचलोकमळापाशी जाऊ कसा? म्हणून महाराष्ट्रातच साचलो२०१४ पासून मात्र पक्ष खचला, सत्तेची चूल विझलीफडणवीसांनी होते नव्हते ते नेले, प्रसाद म्हणून पक्षासाठी ४ नेते ठेवलेपुतण्या, लेकीला घेऊन संगती, सर बारामती लढतो आहेकेलेले पाप धुतो आहे, चिखल गाळ काढतो आहे.सत्तेकडे हात जाताच रडत रडत उठला पाठिंबा नको सर, राजकारणात जरा एकटेपणा वाटलामोडून पडलं स्वप्न माझं, आणि मोडला आहे कणाएकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा

२१ ऑक्टोबरला राज्यात मतदान होणार आहे. २८८ जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केला आहे. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान कोण याची चर्चा जास्त झाली. मात्र येत्या २४ तारखेला राजकीय आखाड्यातील कोणत्या पैलवानाने बाजी मारली हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस