शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

शिखर बँक घोटाळाः शरद पवारांचं नाव का?, सुटकेचा मार्ग कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:36 IST

शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

> सुकृत करंदीकरमुंबई : शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटप प्रकरणांत अनियमितता आढळल्यानं तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘नाबार्ड’च्या अहवालात आहे. ‘नाबार्ड’ने दिलेल्या अहवालाच्या आधारे समाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. -----------------------शरद पवारांचे नाव का?देशात कुठेही आर्थिक गुन्हा घडला असेल तर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार ईडीला आहे. राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यात 'मनी लॉंडरींग' झाल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. काळा पैशाचा वापर झाल्याचे दिसत असल्याने 'ईडी' गुन्हा दाखल करू शकते. त्या अर्थाने 'ईडी'ची कारवाई कायदेशीर आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा कायद्याला धरुन आहे.   .......पवारांना अटक होणार का?तपासासाठी अटक करण्याचा अधिकार ईडीला आहे. अटक झाली तर थेट तीन वर्षे जामीन मिळू शकत नाही. ईडीची अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनदेखील मिळू शकत नाही. ......सुटकेचा मार्ग कोणता?ईडीने ज्याच्या आधारे कारवाई केली आहे, तो गुन्हा दिवाणी आहे की फौजदारी हा मुद्दा कळीचा ठरणारा आहे. याच संदर्भाने ईडीच्या कारवाईविरोधात शरद पवार यांच्यासह उर्वरीत शिखर बँकेचे तत्कालीन संचालक सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. 'एनपीए'त असलेल्या साखर कारखान्यांना कर्ज देणे, आजारी किंवा तोट्यातील कारखान्यांना कर्ज देणे हा दिवाणी गुन्हा ठरतो की फौजदारी या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. न्यायालयाने जर हे मुद्दे दिवाणी ठरवले तर मग गुन्हा आपोअपच रद्द होतो. त्या परिस्थितीत मग 'ईडी'ला कारवाई करण्याचा आधार उरत नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार