शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

24 जानेवारीला महाराष्ट्र बंद; आंबेडकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 14:34 IST

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

मुंबईः वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच भेट होती. त्यांनी आम्हाला विनंती केली की, जसं मागच्या वेळी दादर टीटीचं आंदोलन शांततेत घडलं. त्याच शांततेत हे आंदोलन झालं पाहिजे, आम्हीसुद्धा  त्यांना सांगितलं की दादरचं जसं शांततेत आंदोलन झालं, तसंच आंदोलन आताही होणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.आर्थिक दिवाळखोरीसंदर्भात त्यांनी माहिती मागितली आणि मी त्यांना कळवलेलं आहे. बजेटमध्ये 24 लाख कोटी जमतील असं शासनानं सांगितलं. नोव्हेंबर महिन्यात इकोनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार फक्त 11 लाख कोटी जमलेत, अशी माहिती आहे. 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल. त्या दरम्यान 3 लाख कोटी न जमल्यास शासनाकडे शासन चालवण्यासाठी जो निधी लागतो तोसुद्धा उरणार नाही. लोक व्यवहार करत नाहीत आणि व्यवहार करत नसल्यानं शासनाला जो महसूल हवा आहे तो मिळत नाही.24 जानेवारीला शांततेत बंद होईल. अनेक बँकांच्या संघटनांनी सहभागी होण्याचं कबूल केलं आहे. एसटीवालेसुद्धा सहभागी होईल. एकंदरीत आर्थिक झळ फार मोठ्या प्रमाणात बसली असून, त्याची चर्चा होत नाही. एनआरसी, सीएआरची चर्चा होते, तशी याची चर्चा होत नाही. 40 टक्के हिंदू बाधित होतील, त्यांची नावं आम्ही देणार आहोत. हिंदूंमधीलच काही जातीसंदर्भात आम्ही ही माहिती देणार आहोत. मुस्लिम लोक जागरूक झालेले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.    

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर