शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:20 IST

Maharashtra Board Exam Time Table 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही परीक्षांची तयारी व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असणार आहे. 

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल. या परीक्षेचा समारोप बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

इयत्ता बारावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील आणि ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. या कालावधीत विज्ञान शाखेच्या महत्त्वाच्या प्रायोगिक परीक्षा पूर्ण करण्यात येतील. तसेच, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा देखील घेण्यात येतील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा २ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होतील आणि १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडतील.

शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि कला यांसारख्या विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळा स्तरावरच आयोजित करण्यात येणार आहेत. या विषयांचे अंतर्गत मूल्यांकन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करायचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मुख्य लेखी परीक्षांपूर्वीच या महत्त्वाच्या गुणांची नोंद पूर्ण होईल. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी माहिती दिली की, या अंतर्गत परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळwww.mahahsscboard.in वर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून आपली तयारी सुरू करावी. सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षांच्या सूचनांनुसार वेळेचे अचूक नियोजन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक १७ सादर करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अर्ज भरण्याची विनंती करण्यात आली. अतिविलंब शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी प्रति दिवस २० रुपये आकारण्यात येणार आहे. अर्जाच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांना नोंदणी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर आवश्यक माहिती, सूचना आणि मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे, असे  परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Board Announces SSC-HSC 2026 Exam Schedule: Key Dates Revealed

Web Summary : Maharashtra Board released the SSC and HSC 2026 exam schedule. Class 12 exams start February 10, 2026, and Class 10 exams begin February 20, 2026. Practical exams precede the written tests. Registration details are available on www.mahahsscboard.in.
टॅग्स :Maharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळexamपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा