शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

“स्वतःला भावी CM म्हणता, आधी आमदार तर व्हा”; राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 15:11 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: दहशतवादाचे बीज तुम्ही रोवले. विकासाची दृष्टी ठेवून काम करावे लागते. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागते. जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग आला आहे.  संगमनेर तालुक्यात सुजय विखे यांच्या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत दखल घेतली. विरोधकांनीही कडाडून विरोध आणि निषेध व्यक्त केला. यामुळे संगमनेर येथे सुजय विखे यांचा पत्ता कट झाला आणि ही जागा शिंदे गटाला सुटली, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यातच बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत आता जनताच न्यायाधीश होईल. या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांची जनतेने तुलना करावी. दहशत नेमकी कोणत्या तालुक्यात आहे, याचाही फैसला करावा. संगमनेर तालुका हा विचारांचा, चळवळीचा तालुका आहे. या तालुक्याच्या नादाला लागू नका. पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांनी ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली होती. याला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणता, आधी आमदार तर व्हा

विकासाची दृष्टी ठेवून काम करावे लागते. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागते, नुसत हसून चालत नाही. आता जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून पाण्याचा कायदा संगमनेरवाल्यांनी केला. दहशतवादाचे बीज तुम्ही रोवले. संगमनेरच्या घटनेबाबत आम्ही माफी मागीतली, तुमची ती दानत नाही. तुमचा भाऊ आणि तुमचा स्वीय सहायक लाठ्या काठ्या घेऊन होते, मग दहशतवाद कुणाचा? जनता त्यांच्या पाठीशी नाही. वैफल्यातून त्यांच्याकडून हे सगळे प्रकार सुरू आहे. त्या दिवशी सुजयला मारण्याचा कट होता, मी त्याचा जाहीर निषेध करतो. तुम्ही स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर आमदार तर व्हा, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, मी तुम्हाला पाठिंबा देतो,’ असे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटक पक्षांना केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल, असे वक्तव्य केले होते. यानंतर बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे भावी मुख्य मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. यावरून राधाकृष्ण विखे पाटील टोलेबाजी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsangamner-acसंगमनेरshirdi-acशिर्डीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात