शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 21:19 IST

Narendra Modi Speech on Maharashtra Victory: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड तोडले आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची स्तुती करतो. महाराष्ट्रात सुशासनाचा, सत्याचा विजय झाला आहे. देशात अन्य ठिकाणी देखील पोटनिवडणुका झाल्या. सर्वच राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. देश फक्त आणि फक्त विकासाची मागणी करत आहे. मी देशाच्या जनतेला नमस्कार करतो. मी झारखंडच्या जनतेलाही नमस्कार करतो. झारखंडच्या वेगाने विकास करण्यासाठी आम्ही आणखी ताकदीने काम करणार. भाजपाचा एकेक कार्यकर्ता काम करणार, असल्याचे मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड तोडले आहेत. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही आघाडी-युतीसाठी हा सर्वात मोठा विजय आहे, असे मोदी म्हणाले.  

सतत तिसऱ्यांदा भाजपाच्या नेतृत्वात कोणत्या युतीला विजयी केले. तसेच भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनण्याची सलग तिसरी वेळ आहे. महाराष्ट्र देशातील सहावे राज्य आहे ज्याने भाजपाला सतत तीनवेळा जनादेश दिला आहे. यापूर्वी गोवा, गुजरात, छत्तीसगढ, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सतत तीनवेळा जिंकलो आहोत. बिहारमध्येही एनडीएला तीनवेळा जनादेश मिळाला आहे. आणि ६० वर्षांनी तुम्ही मला तिसऱ्यांदा संधी दिली, असे मोदी म्हणाले. 

या जनतेची सेवा करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. सतत तिसऱ्यांदा स्थिरतेला निवडणे महाराष्ट्राच्या जनतेच्या सामंजस्यातून दिसते. मध्ये काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली. महाराष्ट्राने त्यांना नाकारले आहे. त्याची शिक्षा त्यांना संधी मिळताच जनतेने दिली आहे. या जनतेने जे दिलेय ते विकसित भारतासाठी मोठा आधार ठरणार आहे. हरियाणानंतर महाराष्ट्राच्या जनतेने एकजुटतेचा संदेश दिला आहे, असे मोदी म्हणाले. 

काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांच्या कटाला या राज्याने एक है तो सेफ हैने उत्तर दिले. जाती धर्म भाषा आणि क्षेत्राच्या नावावर लढविणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकविला आहे. आदिवासींनी, ओबीसी, दलितांनी भाजपाला मतदान केले. आमच्या सरकारने मराठीला सांस्कृतीक भाषेचा दर्जा दिला. मातृभाषेचा सन्मान आमच्या संस्कारात आहे, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४