शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:57 IST

Pravin Darekar : जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 Result:  मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. निवडणुकीची आज सकाळी ८ पासून मतमोजणी सुरू आहे. पहिल्या कलानुसार महायुतीने स्पष्ट बहुमताकडे मुसंडी मारली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रात महायुती २०० पार जाईल असे चित्र दिसून येत आहे. माझ्या मताने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, बाजूने उभा आहे. त्यामुळे महायुतीला एक मोठे यश मिळत आहे. आता संजय राऊत आणि विरोधी पक्ष रडीचा डाव खेळू लागलेत. माझ्या मताने लोकशाहीमध्ये पराभव आपण मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. आता संजय राऊत यांनी विमान खाली उतरावे. त्यांना आता वेड्याच्या रूग्णालयात दाखल करावे लागेल, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. 

(Maharashtra Election Results 2024)

आता मुख्यमंत्री हा महायुतीचाच बनणार आहे. जो पक्ष मोठा आहे, त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात येते. भारतीय जनता पक्ष सवाशेच्या आसपास पोहोचणार असून भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा बनणार आहे. यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारले होते,  त्यासाठी हम सब एक है चा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचे सरकार, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळे अधिक मतदान झाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असे वाटले नव्हते. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPraveen Darekarप्रवीण दरेकरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाmayawatiमायावती