शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 05:53 IST

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसने अनेक नव्या चेहऱ्यांना व काही ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी दोन याद्या जाहीर केल्या. ४८ उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर झाली होती. शनिवारी सकाळी दुसरी यादी २३ नावांची तर सायंकाळी तिसरी १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवारांची संख्या ८७ झाली आहे.

काँग्रेसने अनेक नव्या चेहऱ्यांना व काही ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. जालनाचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नव्हते, त्यांना दुसऱ्या यादीत स्थान देण्यात आले आहे. श्रीरामपूर मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत दिग्रस येथून माणिकराव ठाकरे, अंधेरी पश्चिम जागेसाठी सचिन सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

या नेत्यांच्या नातेवाईकांना संधीबँक घोटाळ्यात ५ वर्षाची शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांनी आमदारकी गमावली. विधानसभा लढवण्यास शिक्षेला स्थगिती आवश्यक होती. मात्र, केदार यांनी सत्र न्यायालयात मुदतीत अर्ज न केल्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याजागी पत्नी अनुजा उमेदवार झाल्या.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीतून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र, वर्धातून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर, तर अकोटमधून माजी आमदार सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश यांना संधी मिळाली आहे.

बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयरकामठी मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवले आहे.

शरद पवार गटाचे २२ उमेदवार जाहीरशरद पवार गटाकडून शनिवारी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. अजित पवार गटातून आलेल्या सतीश चव्हाण यांना (गंगापूर) आणि दीपक चव्हाण यांना (फलटण) उमेदवारी देण्यात आली आहे. फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून प्रामुख्याने उमेदवार देण्यात आले आहेत.   

उद्धवसेनेच्या दुसऱ्या यादीत १७ उमेदवारउद्धवसेनेने आणखी १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध संदेश पारकर यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध पवन जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस