शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:31 IST

अशोक पाटील, इस्लामपूर  Maharashtra Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Assembly Election 2024) गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत ...

अशोक पाटील, इस्लामपूर Maharashtra Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Assembly Election 2024) गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना विशेषतः भाजपा नेत्यांकडून घेरण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. यावेळी मात्र वस्ताद शरद पवार यांच्याच तालमीत तयार झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी आली. काट्याने काटा काढण्याचा डाव महायुतीतून आखला आहे.

जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये आलेले निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांनी खेळी केली आहे. इस्लामपूर मतदारसंघाची बारामती करण्याचे जयंत पाटील यांनी अनेकदा बोलून दाखविले. पण हे अपुरे स्वप्न राहिल्याचा धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना इस्लामपूर येथे झालेल्या मेळाव्यात टार्गेट केले. 

तसेच, स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही, असा टोमणाही त्यांनी मारला. त्यामुळे इस्लामपूरची विधानसभा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप गांभीर्याने घेतल्याचे दिसते.

सोशल मीडियावरून समर्थकांचे वॉर... 

इस्लामपूरचे बारामती करण्यावरून सोशल मीडियावर जयंत पाटील, अजित पवार व निशिकांत पाटील यांना एकमेकांच्या समर्थकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इस्लामपूरचे बारामती करण्याऐवजी बारामतीने इस्लामपूरचा धडा घ्यावा, असाही सल्ला जयंत पाटील समर्थकांनी अजित पवार यांना दिला आहे. अशा पद्धतीने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांना ट्रोल करण्याचे वॉर सुरू झाल्याने नागरिकांची करमणूक होत आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीवेळी ठिणगी...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी शरद पवार यांना सोडून राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंडळी सर्वजण अजित पवार यांच्यासोबत गेली. त्यांनी भाजपला पाठिबा दिला. मात्र, जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. हा राग अजित पवार यांना असावा. 

त्यामुळे त्यांनी इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यासाठी निशिकांत पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून आणण्यात आला. 

त्यानंतर त्यांना तिकीट देऊन उमेदवारी अर्ज भरताना अजित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी येथे सभाही घेतली. त्यामुळे इस्लामपूरच्या या लक्षवेधी लढतीकडे राज्याचे लक्ष लागून संपूर्ण राहिले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवार