शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला ‘खो’

By admin | Updated: July 22, 2014 22:13 IST

वृक्षरोपणावर पैशासारखा पाऊस, सहा वर्षात २९७.३८ कोटींचा खर्च, वनक्षेत्र वाढीचा दुष्काळ कायमच,

वाशिम: वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडला जात आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांची अवैध कटाई सुरूच आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट देणारी यंत्रणा वृक्षसंवर्धनाच्या उद्दिष्टाला मात्र 'खो' देत आहे. वृक्षरोपणाचा गाजावाजा करणार्‍या यंत्रणेने वृक्ष संवर्धनही गांभीर्याने घेतले तर वनराईच्या घटणार्‍या प्रमाणाला आळा बसल्याशिवाय राहणार नाही.समतोल निसर्गचक्रावरच आपले अस्तित्व असल्याच्या जाणीवेचा मानवाला विसर पडत चालल्याने पर्यावरणाचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी पदोपदी घेत आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला. मात्र, असे करताना त्याचे पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष होत गेल्याने पर्यावरण प्रदुषित झाले. प्रदुषित पर्यावरणाचे गंभीर परिणाम मानव भोगत आहे. गरजांची पुर्तता आणि भौतिक सुख-संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वत:ला सुरक्षित समजणार्‍या मानवाला आता भूतलावरील आपल्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे अनिवार्य ठरू पाहत आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाचा उकाडा, हे बनू पाहणारे समिकरण पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालल्याचे द्योतक ठरत आहे. वनविभागाच्या लेखी वाशिम जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५१८४ चौ.कि.मी. असून त्यापैकी केवळ पाच टक्क्याच्या आसपास वनराई डोलत आहे. वनक्षेत्राचा आकडा फुगविण्यासाठी दरवर्षी विविध विभागाच्या सहकार्यातून वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. मात्र, वृक्ष संवर्धनासाठी ठोस उपाययोजना नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या अपेक्षेपेक्षाही कमीच राहत असल्याचे आकडेवारी सांगते. २0१३ या वर्षात जिल्ह्यात सात लाख ४७ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ठ होते. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र, वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्टच नसल्याने 'जीवंत' झाडांची संख्या गुलदस्त्यातच आहे. एकिकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर ह्यकुर्‍हाडह्ण कोसळली जात असल्याने वनराईचे प्रत्यक्षातील प्रमाण 'जैसे थे'च राहत आहे. पर्यावरण र्‍हासाच्या संभाव्य धोक्याच्या पृष्ठभूमीवर पर्यावरण संवर्धन करणे, काळाची गरज बनले आहे. प्राचीन काळी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहणार्‍या मानवाने आता सदर चौकटी उद्ध्वस्त करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. निसर्गावर नानाविध प्रयोग करीत वर्तमानाशी जुळवून घेताना त्याचे भविष्याकडे पार दुर्लक्ष होत गेले आणि येथूनच खर्‍या अर्थाने पर्यावरण र्‍हासाची प्रक्रिया सुरू झाली. मानवाने आपल्या दैनंदिन व अनावश्यक गरजा भागविण्यासाठी निसर्गाशी खेटे घेण्यातदेखील मागे-पुढे पाहिले नाही. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात अनेक चांगले बदल होत असले तरी त्याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. मानवाने आपल्या या वर्तनात बदल केले नाहीत तर पर्यावरणच मानवी जीवन बदलवून टाकेल.