शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

By admin | Updated: June 23, 2014 04:12 IST

कल्याण येथील तहसीलदार कार्यालयात १०० रुपयांच्या मुद्रांकावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी स्टँप व्हेंडर ग्राहकांकडून ४०० ते ४५० रुपये घेत

राजेंद्र वाघ, शहाडकल्याण येथील तहसीलदार कार्यालयात १०० रुपयांच्या मुद्रांकावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी स्टँप व्हेंडर ग्राहकांकडून ४०० ते ४५० रुपये घेत असून, सध्या ग्राहकांची सर्रास लूट करीत आहेत. मात्र ग्राहकांच्या तक्रारीनंतरही शासन ही लूट थांबविण्याबाबत हतबल झाले असल्याचे दिसते.बारावी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जातीचा दाखल, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेयर आदी दाखले मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात विद्यार्थी व पालक यांची मोठी गर्दी होत आहे. याशिवाय जर शाळा सोडल्याचा मूळ दाखला हरविल्यास, जात पडताळणी प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी, शेतीच्या सातबारावरील नावे कमी अधिक करण्यासाठी, विजेचे मीटर नावावर करण्यासाठी व अपत्याचा दाखला यापैकी बहुतांश दाखले अथवा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी १०० रुपयांच्या मुद्रांकावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून त्याचे नोटरी करून द्यावे लागते. सध्या मात्र अशी सत्यप्रतिज्ञा लिहून व नोटरी करून आणणारे दस्तलेखक (स्टॅम्पव्हेंडर) ग्राहकांकडून ४०० ते ४५० रुपये उकळत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता १०० रुपयांचा मुद्रांक असेल तर लिहिण्याचा खर्च व नोटरी करून देणाऱ्या वकिलाची फी किती, याबाबत मात्र दस्तलेखक काहीही बोलायला तयार नाहीत़ असे असले तरी तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सत्यप्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी २०० रुपयांपेक्षाही कमी खर्च येत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे दस्तलेखकांकडून सध्या ग्राहकांची मनमानी पद्धतीने सर्रास लूट सुरू असून त्यांच्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे.अनधिकृत मुद्रांक विक्रेत्यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याबाबत मी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पत्र दिले आहे. तेव्हा लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर ग्राहकांची लूट करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. फक्त ग्राहकांनी आम्हाला योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी केले आहे. (वार्ताहर)