शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: लॉकडाऊनची तयारी! टास्क फोर्सची बैठक संपत नाही तोच मुख्यमंत्र्यांची सचिवांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 20:04 IST

Lockdown in Maharashtra, CM meeting with Secretary of Maharshtra: टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत (Secretary meeting) बैठक आयोजित केली आहे. रात्री 8.30 वाजता ही बैठक सुरु होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच कोरोना टास्क फोर्ससोबत (Corona Task Force) कोरोना संकटावर बैठक पार पडली. यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत (Secretary meeting) बैठक आयोजित केली आहे. रात्री 8.30 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. ( CM Uddhav Thackreay called immediate meeting with the Maharashtra Secretary on Lockdown in Maharashtra.)

या बैठकीत राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन लावायचा की तीन आठवड्यांचा यावर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच कोणाला सूट द्यायची आणि कोणावर निर्बंध लादायचे आदी नियमावली देखील चर्चेत येणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्या सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये राज्यातील लॉकडाऊनचे होणारे परिणाम, कोणाला मदत करायची, किती करायची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाऊनला वेळ असला तरीदेखील उद्या याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

लॉकडाऊन कधी जाहीर करणार....मुख्यमंत्री दोन दिवस अर्थ विभाग आणि अन्य विभागांशी चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन लावताना गरीब वर्गाला कशा पद्धतीने मदत करता येईल यावर चर्चा होणार आहे. तसेच लगेचच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता नसून बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच १४ एप्रिल नंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

कालच्या बैठकीत काय झाले?काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis)  सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. 

राजेश टोपे यांनी उद्यापासून लगेचच लॉकडाऊन करण्यात येणार नाही, काही दिवसांचा वेळ देऊन ल़ॉकडाऊन केला जाईल, असे सांगितले आहे. यामुळे थोड्याच वेळात 8 दिवस की 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी लॉकडाऊन करण्याआधी तीन कामकाजी दिवसांचा वेळ द्यावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस