शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:43 IST

Nagpur Leopard Attack News: महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूर, नाशिक, रायगड आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आज पहाटे नागपूर शहरातील पारडी भागात बिबट्याने अचानक काही नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या कापसी भागात दिसला होता. हल्ला केल्यानंतर हा बिबट्या पारडी भागातील एका दुमजली इमारतीत लपला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस मोठे प्रयत्न करत आहेत. लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल, असा विश्वास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बिबट्याच्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये संताप

या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी पारडी परिसरात दोन बिबट्यांनी दहशत निर्माण केली होती, त्यापैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. परंतु, दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. एका संतप्त नागरिकाने आरोप केला आहे की, "हा बिबट्या वेळीच पकडला गेला असता तर, आज अनेकांना जखमी होण्यापासून वाचवता आले असते."

बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या इमारतीत बिबट्या लपल्याचा संशय आहे, त्याच्या जवळील इमारतीच्या गच्चीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वनविभागाने नागरिकांना गर्दी न करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Terror in Nagpur: Four Attacked, Rescue Operation Underway

Web Summary : A leopard attacked four people in Nagpur's Pardi area early morning, injuring them. The leopard is suspected to be hiding in a building, prompting a rescue operation. Angry residents blame the forest department for failing to capture the leopard earlier.
टॅग्स :Leopard Attackबिबट्याचा हल्लाleopardबिबट्याnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकgondiya-acगोंदिया