अजितदादा विविध संस्थेत मोठ्या पदांवर होते, आता पार्थ-जय पवारांवर जबाबदारी; कोणाला-कोणती पदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:02 IST2026-02-04T13:59:20+5:302026-02-04T14:02:34+5:30

Ajit Pawar Sad Demise: बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाल्याचे म्हटले जात आहे.

late ajit pawar held important positions in various organizations now the responsibility falls on son parth pawar and jay pawar know who will get what | अजितदादा विविध संस्थेत मोठ्या पदांवर होते, आता पार्थ-जय पवारांवर जबाबदारी; कोणाला-कोणती पदे?

अजितदादा विविध संस्थेत मोठ्या पदांवर होते, आता पार्थ-जय पवारांवर जबाबदारी; कोणाला-कोणती पदे?

Ajit Pawar Sad Demise: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु, यानंतर आता एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अजित पवार ज्या विविध संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर होते, त्या पदांची जबाबदारी आता पार्थ पवार आणि जय पवार यांच्या खांद्यावर देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून, कोणाला कोणती पदे मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे म्हटले जात आहे. 

अजित पवार हे माळेगाव साखर कारखाना चेअरमन, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त, महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष पद, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य, रयत शिक्षण संस्था संचालक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत होते. या पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महत्त्वाची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे तर जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे कोणती पदे जाणार, याबाबत आता चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

बारामती येथे असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथे एक महत्त्वाची बैठक झाल्याचे म्हटले जात आहे. शरद पवार, पार्थ पवार जय पवार आणि विद्या प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ या बैठकीत होते. त्यानंतर शरद पवार, पार्थ पवार, विजया पाटील आणि जय पवार यांची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये भविष्यातील राजकीय समीकरणांची चर्चाही होऊ शकते, अशी कुजबुज सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे पार्थ पवार आणि जय पवार या दोघांची नावे या जागेसाठी चर्चेत आहेत. ही जागा घेण्यापेक्षा पार्थ पवार यांना राज्यसभेचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण  असलेल्या जागेवर पाठवले जाण्याची शक्यताही आहे. लवकरच राज्यसभेची ही जागा भरली जाणार आहे. 

 

Web Title : अजित पवार के पद: पार्थ, जय पवार को अब जिम्मेदारियां मिलेंगी

Web Summary : राजनीतिक चर्चाओं के बाद, अजित पवार के विभिन्न संस्थागत पदों से जिम्मेदारियां पार्थ पवार और जय पवार को सौंपे जाने की संभावना है। पवार परिवार के भीतर इन पदों के वितरण पर चर्चा चल रही है, विद्या प्रतिष्ठान में एक महत्वपूर्ण बैठक हुई।

Web Title : Ajit Pawar's posts: Responsibilities shift to Parth, Jay Pawar now

Web Summary : Following political discussions, responsibilities from Ajit Pawar's various institutional posts are likely to be handed over to Parth Pawar and Jay Pawar. Discussions are underway regarding the distribution of these positions within the Pawar family, with a key meeting held at Vidya Pratishthan.