शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

"गेल्या लॉकडाऊनमध्ये गरीब मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली, आताही गरज वाटेल तेव्हा सरकार मदत करेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 3:36 PM

नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास. गेल्या लॉकडाऊनमध्ये गरीब मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली, आताही गरज वाटेल तेव्हा सरकार व्यवस्था करेल : नवाब मलिक

ठळक मुद्देगेल्या लॉकडाऊनमध्ये गरीब मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली, आताही गरज वाटेल तेव्हा सरकार व्यवस्था करेल : नवाब मलिकउत्तर प्रदेशात राम भरोसे कारभार, मलिक यांची टीका

"पॅकेज जाहीर करून कर्जबाजारी व्हा... कर्ज घ्या असे मोदीजी जाहीर करतात पण या राज्यात लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना केंद्राप्रमाणे पैसे देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात जो गरीब मजूर वर्ग आहे त्यांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी सरकारने चार महिने सगळी व्यवस्था केली होती. आताही गरज वाटेल तेव्हा सरकार निश्चितरुपाने व्यवस्था करेल," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी परिस्थिती आम्हाला शिकवत आहेत त्यांनी गुजरातमध्ये हॉस्पिटलशिवाय लोकं मरत आहेत. गुजरात मॉडेलची काय परिस्थिती आहे हे बघितले पाहिजे असा सल्लाही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. "लॉकडाऊनमध्ये राज्यात ज्यापद्धतीने कामे सुरू आहेत, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कौतुक करत आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री महेंद्र पांडे मुंबईत आले असता त्यांनीही कौतुक केले आहे. अशाप्रकारची कामे कुठल्याही राज्यात झाली नाहीत," याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.उत्तर प्रदेशात राम भरोसे कारभार"उत्तर प्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर करत नाही. अॅन्टीजेन चाचण्या ८० टक्के अॅक्युरसी नाहीत. युपी सरकारने योग्यप्रकारे टेस्टींग केल्या तर वेगळी परिस्थिती होऊ शकते," असेही नवाब मलिक म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्यसरकार जिंदाबाद... मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. परंतु तिथे गेल्यावर भाजपचा मुर्दाबाद केला हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारnawab malikनवाब मलिकNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी