शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वंजारी समाजात एकी ठेवा

By admin | Updated: June 8, 2017 01:31 IST

वंजारी समाजात विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : वंजारी समाजात विविध संघटना स्थापन होऊ लागल्या आहेत. ही चांगली बाब आहे. परंतु, एकमेकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. समाजात कोणतीही फूट पडणार नाही, याची काळजी घ्या. वंजारी समाजातील एकी कायम ठेवा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. वंजारी महासंघातर्फे नव्याने निवड झालेल्या समाजातील पोलीस उपनिरीक्षकांचा गौरव कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी झाला. त्या वेळी मुंडे बोलत होत्या. आमदार महेश लांडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गिते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हंगे, ज्येष्ठ वकील सुधाकर आव्हाड, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी उपस्थित होते. जातीपातीची शिकवण आम्हाला दिलेली नाही. परंतु, आपण ज्या समाजात जन्माला आलो, तो समाज वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज प्रत्येक समाजात भिंती वाढत चालल्या आहेत. राजकारणी त्यास खतपाणी घालून अधिक मजबूत करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, अहल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांना प्रत्येक समाजाने वाटून घेतले आहे. शिवाय या नेत्यांना सोशल मीडियातून बदनाम करून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सर्व प्रकार तरुणांनी थांबवून आपली ऊर्जा सकारात्मक गोष्टीसाठी वापरली पाहिजे, असा सल्ला मुंडे यांनी दिला. अन्यथा मी फोटो काढणार नाहीपंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्काराच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली. त्यामुळे उडालेला गोंधळ थांबविण्यासाठी दस्तुरखुद्द ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी हातात माईक घेतला. व्यासपीठावरील कार्यकर्त्यांनी खाली जावे अन्यथा मी फोटो काढू देणार नाही, असा सज्जड इशारा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबला. >पिंपरी-चिंचवड : गोपीनाथ मुंडेंचा गड गोपीनाथ मुंडे यांचे पिंपरी-चिंचवडवर विशेष प्रेम होते. त्या वेळीपासून हा मुंडेंचा गड म्हणून ओळखला जात आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. द्रोणाचार्यांनी ज्याप्रमाणे अर्जुन व दुर्योधन या दोघांना प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे आम्हालाही मुंडे यांनी शिकवण दिली. परंतु, अर्जुनाच्या भूमिकेतून मी समाजासाठी हे धर्मयुद्ध लढण्याचे ठरविले आहे, असे सांगून पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.