खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कणकवली-मुंबई एसटी शनिवारी मध्यरात्री २० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालकासह ३७ प्रवासी जखमी झाले आहेत़ बसमध्ये पाच लहान मुलांसह एकूण ४३ प्रवासी होते. कणकवली-मुंबई ही बस कणकवलीहून रात्री ८.४५ वाजता मुंबईकडे रवाना झाली. संगमेश्वर येथून रात्री १० वाजता निघालेली ही बस भोस्ते येथील अवघड वळणावर रात्री १२.३०च्या सुमारास आली असता चालक शैलेंद्र शत्रुघ्न कोचरेकर याचा बसवरील ताबा सुटल्याने ती २० फूट खोल दरीत कोसळली. मात्र मध्ये एका झाडाला ती अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यातील ३७ प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, त्यांना कळंबणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}