शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झिशानला अदानी गु्रपची नोकरी

By admin | Updated: June 1, 2015 04:51 IST

केवळ मुसलमान आहे म्हणून एका कंपनीने नोकरी नाकारलेला झिशान खान लवकरच अदानी गु्रपचा विशेष प्रशिक्षक म्हणून कार्यरत होणार आहे

मुंबई : केवळ मुसलमान आहे म्हणून एका कंपनीने नोकरी नाकारलेला झिशान खान लवकरच अदानी गु्रपचा विशेष प्रशिक्षक म्हणून कार्यरत होणार आहे. यासाठी त्याने या गु्रपच्या अहमदाबाद येथील मुख्य कार्यालयात जाऊन नोकरीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि आता अदानीच्या मुंबईतील कार्यालयात तो रुजू होणार आहे.एमबीए पूर्ण केल्यावर खानने हरे कृष्णा या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यावर मुसलमानांना नोकरी देत नसल्याचे या कंपनीने ई-मेलद्वारे कळवले. या घटनेबाबत विविध सामाजिक स्तरांतून रोष व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कंपनीने जाहीर माफी मागितली. या घटनेनंतर खानला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या आॅफर आल्या. त्यातून त्याने अदानी ग्रुपला प्राध्यान दिले. ही घटना घडल्यानंतर मला अनेक कंपन्यांनी ई-मेल करून नोकरीची आॅफर दिली. अदानी गु्रपनेही नोकरीचा मेल केला होता. या सर्व मेलमधून मी अदानी कंपनीची निवड केली. कारण ही कंपनी उत्कृष्ट आहे, असे खानने सांगितले. तर आपण जात व धर्मापेक्षा बुद्धिमतेला प्राधान्य दिले पाहिजे; आणि झिशानमध्ये कर्तृत्व आहे त्यामुळेच त्याला नोकरीची आॅफर देण्यात आली, असे कंपनीचे म्हणणे आहे.