शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मी २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत स्वत:ची तुलना केली तर...; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'मन की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:03 IST

राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांत आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१४ साली पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या फडणवीस यांना २०१९ मध्ये दुसऱ्या शपथविधीनंतर केवळ काही तासांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०२२ साली सरकार आल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मात्र आता भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. या राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांतील अनुभवांतून आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मागील १० वर्षांचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. भाजपमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते, जेव्हा निवडणुकीत आपला विजय होतो तेव्हा ते एक टीम वर्क असतं आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा तो एक धडा असते. या सर्व कालखंडात मला शिकवणूक मिळाली आहे आणि मी माझी तुलना २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत केली तर आज मी स्वत:ला अधिक प्रगल्भ झाल्याचं मानतो. कारण वेगवेगळ्या अनुभवांमधून वास्तव आपल्या लक्षात येतं आणि काही आघात सहन केल्यामुळे आपली शक्ती वाढते, आत्मिक ताकद वाढते. तसंच एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करावा, हेही आपल्याला कळतं. त्यामुळे माझ्यात मागील १० वर्षांत बदल झाला असून तो चांगल्या दिशेने झाला आहे," असं म्हणत फडणवीस यांनी मागील दशकभराच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयाचं कारण कोणतं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपनेही आजपर्यंतच्या राज्याच्या राजकारणाच्या इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करत १३२ जागांवर विजय मिळवलं. या यशाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या विजयात नक्कीच हिंदुत्त्वाचा मोठा वाटा आहे. लोकांनी महाविकास आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला उत्तर दिलं आहे. हिंदू समाजाने जातपात विसरून आम्हाला मतदान दिलं. पण त्यासोबत आमच्या सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्यातून आमच्याविषयी प्रो इन्कम्बन्सी तयार झाली आणि त्यामुळे हे यश मिळालं," असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगामी काळात नदीजोड प्रकल्प आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुतीMaharashtraमहाराष्ट्र