शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:53 IST

Eknath Shinde Shahajibapu Patil: मुख्यमंत्रि‍पदाबद्दल शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. मी निवडून आलो असतो, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितले. 

Maharashtra latest News: 'मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते', असं विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. जुनी उदाहरणे देत त्यांनी कारणही सांगितले. याचवेळी शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल खदखद व्यक्त केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रि‍पदाबद्दल हे विधान केले. 

ठाकरेंमुळे शिवसेना मागे गेली -पाटील

शिवसेनेबद्दल बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, "गंगेचा उगम पवित्र आहे कारण तिचा उगम शंकराच्या जटेतून झाला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही पवित्र आहे, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तिचा उगम झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना मागे गेली. सोलापूर जिल्ह्यात पक्षाची सूत्रे दुसऱ्याकडे गेल्यामुळे शिवसेनेची पिछेहाट झाली." 

वाचा >>“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

'...तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते' 

मुख्यमंत्रि‍पदाबद्दल बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही. मी निवडून यायला पाहिजे होतो. मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. कारण मी १९९५ ला निवडून आलो, तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी २०१९ मध्ये निवडून आलो, तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले."

'उद्धव ठाकरेंच्या हाताला आयोडेक्स लावायची वेळ आली होती'

"माझी रास शिवसेनेची आहे, पण मी पूर्वी कसा काय काँग्रेसमध्ये गेलो होतो, मला माहिती नाही.राज्यातील लोक म्हणतात की, एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. मागील दोन वर्षात एकनाथ शिंदेंनी खूप कष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात न भूतो न भविष्यती असा महाराष्ट्राचा निकाल लागला. शरद पवारांसारख्या माणसाचे फक्त १० लोक निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या हाताला तर आयोडेक्स लावायची वेळ आली होती. पण, त्यांना काही यश मिळाले नाही", असे खोचक भाष्य शहाजीबापू पाटील यांनी केले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती