आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: July 23, 2015 02:12 IST2015-07-23T02:12:12+5:302015-07-23T02:12:12+5:30

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने बुधवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

IAS officers transfers | आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने बुधवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. विजय सिंघल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नवे आयुक्त असतील. निधी पांडे औरंगाबादच्या नव्या जिल्हाधिकारी असतील. त्या वीरेंद्रसिंग यांची जागा घेतील.
प्राजक्ता लवंगारे यांची बदली विक्रीकर सह-आयुक्त; मुंबई या पदावर झाली आहे. एम. संकरनारायणन मनरेगाचे आयुक्त (नागपूर) होते. आता त्यांची बदली माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी झाली आहे. एस. एन. भांगे, मुंबई दुरुस्ती आणि पुनर्निर्माण महामंडळाचे नवे मुख्याधिकारी असतील. येथे असलेले एस. डी. लाखे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव म्हणून करण्यात आली आहे.
परभणी महापालिकेचे आयुक्त ए. ए. महाजन यांची बदली मनरेगाच्या आयुक्तपदी (नागपूर) करण्यात आली आहे. ई. रवींद्रन कल्याण-डोंबिवलीचे नवे महापालिका आयुक्त असतील. आतापर्यंत एम.जी.आर्दाड हे तेथे आयुक्त होते.
हिंगोली जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार आता परभणीचे नवे महापालिका आयुक्त असतील. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग; नाशिक येथे उपमहानिरिक्षक एम. ए. गुंडे (अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्ग) या नागपूर महापालिकेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त असतील. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: IAS officers transfers