शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांना शपथ घेताना पाहून सगळेच उडाले; पण जितेंद्र आव्हाडांनी काय केलं माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 16:32 IST

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यात राजकीय भूकंप झाला होता

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्यानं गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मोठ्या खुबीनं परिस्थिती हाताळत डॅमेज कंट्रोल केलं. अजित पवारांनी बंड केल्यानं महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांना जोरदार धक्का बसला. राज्याच्या राजकीय वर्तुळात धक्कादायक घडामोडी सुरू असताना आपण झोपलो होतो, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी मी घरी झोपलो होतो. अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यावर पत्नी आणि मुलीनं मला झोपेतून उठवलं. अजितदादांना शपथ घेताना पाहून मी पुन्हा झोपलो. जाऊ दे, आता झालं ते झालं, अशी माझी त्यावेळची प्रतिक्रिया होती, असं आव्हाड यांनी सांगितलं. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात केलेली घोषणाबाजी त्यावेळी घडलेल्या घटनांना मिळालेली प्रतिक्रिया होती, असंदेखील ते म्हणाले. अजित पवार भाजपासोबत गेले, तरी शरद पवार आणि भाजपा हे समीकरण जुळणार नाही, याची मला खात्री होती. त्यामुळे तेव्हा मी लगेच सक्रीय झालो. ट्विट करुन माझी भूमिका स्पष्ट केली. आता शरद पवार काय करणार, असा प्रश्न त्यावेळी विचारला गेला. शरद पवारांनी लगेच यशवंतराव चव्हाण सेंटर गाठलं. त्यावेळी तिथे अजित पवारांविरोधात झालेली घोषणाबाजी हा कार्यकर्त्यांचा संताप होता. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या, असं आव्हाड म्हणाले.अजित पवार माघारी परतल्यानंतर दोन-तीनदा त्यांची भेट झाली. मात्र त्यांच्या मनात कोणतीही कटुता नाही. ते अतिशय परिपक्व नेते आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून झालेली घोषणाबाजी परिस्थितीवरील प्रतिक्रिया होती, याची अजित पवारांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणताही किंतु-परंतु नाही, असंदेखील आव्हाड यांनी सांगितलं. अजित पवारांच्या बंडावर खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही, असंदेखील ते म्हणाले.  

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार