शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:06 IST

Court News: चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.

- डॉ. खुशालचंद बाहेतीछत्रपती संभाजीनगर - चावा घेतल्यानंतर दखलपात्र गुन्हा नोंदवता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. यामुळे मानवी दातांनी चावणे अदखलपात्र गुन्हा ठरणार आहे.

व्यवसायाने वकील असणाऱ्या तानाजी सोलनकर आणि माया सोलनकर यांच्यात मालमत्तेचा वाद होता. यावरून त्यांच्यात भांडण झाले. माया यांनी आरोप केला की, वकील सोलनकर यांनी माया आणि तिचा भाऊ लक्ष्मण यांच्या हाताला चावा घेतला आणि त्यामुळे त्यांना दुखापत झाली.

निवाड्याचे दिले संदर्भतानाजी सोलनकर व इतरांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२४ (धोकादायक शस्त्रांनी दुखापत), ३२३ (दुखापत), ५०४ (शिवीगाळ), ५०६ (धमकी) अंतर्गत उमरगा पोलिस स्टेशन येथे २६ एप्रिल २०२० रोजी या प्रकरणी  एफआयआर दाखल करण्यात आला होता.

तानाजी सोलनकर यांनी न्यायालयात एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने शकील अहमद विरुद्ध दिल्ली राज्य (२००४) या खटल्याचा आधार घेतला.

न्यायाधीश विभा कंकणवाडी आणि संजय ए. देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटले की, मानवी दातांनी चावून दुखापत करणे हे कलम ३२४ भारतीय दंड संहिता, (११८(१) भारतीय न्याय संहिता) ऐवजी कलम ३२३ भारतीय दंड संहिता अंतर्गत स्वेच्छेने दुखापत करण्याचा गुन्हा आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी