शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कोट्यातील घरांच्या फायली हरवल्या

By admin | Updated: June 10, 2015 02:47 IST

मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकारात वितरित केलेल्या घरासंबंधीच्या फायली हरवल्याची माहिती राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकारात वितरित केलेल्या घरासंबंधीच्या फायली हरवल्याची माहिती राज्य शासनाने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. या फायली १९८२पासूनच्या असल्याने न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने शासनाला चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री कोट्यातून वितरित झालेल्या घरांच्या चौकशीसाठी गेल्या वर्षी निवृत्त झालेले न्यायाधीश जे.ए. पाटील यांच्या आयोगाची स्थापना केली असून, त्या फायली हरविल्याचे तेव्हाच का नाही सांगितले, असा सवाल करीत या प्रकरणी न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस जारी करणेच योग्य ठरेल. त्यामुळे गृहनिर्माण व नगर विकास खात्याने याचा खुलासा प्रतिज्ञापत्रावर करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले.मुख्यमंत्री कोट्यातून एका व्यक्तीला एकच घर वितरित करण्याचा नियम असताना अनेकांनी या कोट्यातून दोन ते तीन घरे घेतली आहेत. त्यामुळे याची चौकशी करून यासाठी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे.या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करताना सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी खंडपीठाला ही माहिती दिली. तसेच या कोट्यातून दोन घरे घेतलेल्यांपैकी १२०० जणांनी घरे परत केली असून, ३०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे, असेही अ‍ॅड. याज्ञिक यांनी न्यायालयाला सांगितले व याचा अहवालही खंडपीठासमोर ठेवला.मात्र या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष घर वितरण करताना मूळ लाभार्थीचा तपशीलच नसल्याचे अहवालातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे आतापर्यंत नेमकी काय व कशी कारवाई झाली आहे, याचे शासनाने नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. -----------कोट्यातून एका व्यक्तीला एकच घर वितरित करण्याचा नियम असताना दोन-तीन घरे घेतलेल्यांची चौकशी करून कारवाई करण्याची याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केली आहे.