शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांना हवा आधार

By admin | Updated: August 20, 2014 22:02 IST

संजय गांधी निराधार योजनेपासूनही वंचित: मानवतावादी दृष्टीतून प्रयत्न होण्याची गरज

बुलडाणा : आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या कुटुंबांमधील मुलांची अवस्था अतिशय वेदनादायक असते. त्यातच अशी मुलं एचआयव्हीबाधित पालकांची असली, तर त्यांच्या माघारी मुलांच्या नशिबी हेटाळणीशिवाय दूसरं काहीच येत नाही. संजय गांधी निराधार योजनेच्या काही अटींमुळे, या निराधार बालकांना शासकीय मदतीचा लाभ मिळत नाही, ही शोकांतिका आहे.एचआयव्हीबाधित रूग्णांसाठी शासन कोट्यवधी रूपयांचा खर्च करते; मात्र या रूग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांची होणारी वाताहत दुर्लक्षित झाली आहे. असे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते. व्यापक जनजागृती होऊनही समाजात एचआयव्हीची भीती कायमच असून, या परिस्थितीला हा मुद्दा तेवढाच कारणीभूत आहे. त्यामुळे एचआयव्हीबाधित रूग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुंटुंबियांना प्रचंड ससेहोलपट सहन करावी लागते. एचआयव्हीने मृत्यू झालेल्या दांम्पत्यांच्या मुलांची एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील संख्या ६0 पेक्षा जास्त आहे. ही मुलं सध्या अशाच परिस्थितीतून जात आहेत. आईवडील दोघांचाही मृत्यू झालेल्या कुटूंबातील ही मुलं नातेवाईकांच्या आङ्म्रयाने राहत आहे. या मुलांची काळजी नातेवाईक घेत असले, तरी त्यांना आई-वडीलांची सर येत नाही. बहुतांश मुलं एचआयव्हीबाधित असल्यामुळे सहाजिकच अशा त्यांच्या आरोग्याचे प्रश्नही गंभीर होतात. या मुलांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत असणारी उत्पन्नाची अटही या योजनेच्या लाभापासून मुलांना वंचित ठेवत आहे. ज्या मुलांचे संगोपन सध्या कुटुंबातील ुआजी किंवा आजोबा करीत आहेत, त्यांची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. ** औषधोपचारात होते चालढकलसमाजामध्ये एचआयव्हीची भीती आजही कायम आहे. त्यामुळे एचआयव्हीबाधित आई-वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ बालकांच्या नशिबी हेटाळणीचे भोग येतात. या बालकांना दर महिन्याला औषधोपचारासाठी एआरटी केंद्रावर आणावे लागते; मात्र त्यांना औषोधोपचारासाठी आणण्याची तसदी नातेवाईक नियमीतपणे घेत नाहीत. बरेचदा ग्रामीण भागातील रूग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एआरटी केंद्रापर्यंत येण्याचा प्रवास खर्चही झेपावत नाही.