शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट कुपोषण बळींवरून हायकोर्ट सरकारवर नाराज; ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:00 IST

बाल मृत्यूच्या समस्येवर मात कशी करणार ते सांगा: कोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मेळघाटात कुपोषणाने अर्भके, गर्भवती आणि स्तनदा मातांचे मृत्यू होत असताना या समस्येवर उपाय करण्याबाबत सरकार ठोस प्रयत्न करीत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मृत्यूची मूळ कारणे शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची आणि ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याची सूचनाही न्यायालयाने सरकारला केली.

समस्या अनेक आहेत. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती आणि निर्धार असायलाच हवा, अशी टिप्पणी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने केली. मेळघाटात कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. 

कुपोषणामुळे अर्भके, गर्भवती महिला आणि स्तनदा माता असे ११५ हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती उजेडात आल्यानंतर न्यायालयाने, ‘आपल्याला तीव्र धक्का बसला आहे’, असे नमूद केले. तथापि,  सर्व मृत्यू केवळ कुपोषणामुळे नाही तर त्यामागे अन्य कारणे आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. मेळघाटात बहुसंख्य मुलींचे लग्न वयाच्या १३ व्या वर्षी होते आणि त्यानंतर लगेचच त्या गर्भवती राहतात. अनेकदा अकाली प्रसूती होते. त्यातूनच वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होते, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

बाल मृत्यूच्या समस्येवर मात कशी करणार ते सांगा: कोर्ट

गेल्या दोन-तीन दशकांपासून हे मृत्यू होत आहेत. सामान्य कारणांमुळे असे मृत्यू होऊ नयेत, यासाठी सरकारने ‘शून्य सहनशीलते’चा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार कोणती कार्ययोजना  आखणार आहे, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, त्या भागांतील लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही न्यायालयाने सरकारला केले.

आरोग्य केंद्रे बळकट करा

प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करण्यासाठी पावले उचलावीत आणि नव्याने पदवीधर झालेल्या डॉक्टरांसोबतच अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ तेथे सेवा देतील, याची काटेकोर दक्षता घ्यावी, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने केली. त्यावर, ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना राबवून मूलभूत वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही न्यायालयाने सरकारला सुचविले.

English
हिंदी सारांश
Web Title : High Court upset over Melghat malnutrition deaths; suggests zero tolerance.

Web Summary : Bombay High Court expressed displeasure over the Maharashtra government's handling of malnutrition deaths in Melghat. The court urged a 'zero tolerance' policy, emphasizing investigation into root causes and strengthening healthcare facilities with specialists to prevent further fatalities among infants and mothers.
टॅग्स :MelghatमेळघाटMumbai High Courtमुंबई हायकोर्ट